Lok Sabha Election 2024 : पुण्यासाठी दिल्लीश्वरांना हवेत चंद्रकांतदादा? मोहोळ-मुळीकांचा प्रचारही जोरात

Chandrakant Patil News : चंद्रकांत पाटील हे सध्या कोथरूडचे आमदार असून, राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. कोथरूडमधील निवडणुकीवेळी त्यांच्यावर बाहेरचे उमेदवार म्हणून टीकाही झाली होती.
Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Jagdish Mulik
Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Jagdish MulikSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याचा खासदार होऊन दिल्लीत राजकारण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षातील बडी मंडळी कामाला लागली आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पुण्यातून लढणार, ते नसतील तर मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून खासदार होणार. तेही मागे पडले तर दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने सुनील देवधरांचे नाव पुढे. ही नावे ऐकून स्थानिक इच्छुक मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीकांच्या पोटात गोळा आल्याचे ऐकिवात आहे.

मोहोळ, मुळीक, शिवाजीराव मानकरांनी आपण भक्कम दावेदार असल्याचे दावे ठोकून एकप्रकारे प्रचारालाच प्रारंभ केला. पण, आता मोहोळ, मुळीक, मानकरांच्या शर्यतीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनाही दिल्लीत पाठवले जाण्याची आवई उठली आहे. पण, पुणे लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिकिटासाठीच्या शर्यतीचा निकाल पाहण्यासाठी भाजपच्या दुसऱ्या यादीची वाट पाहावी लागणार आहे.

पुण्यात लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण भाजप पुन्हा पुणेकरांसह भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना धक्का देण्याची तयारी असल्याचे समजते. आधी कोथरूडमध्ये आमदारकी आणि आता थेट पुण्याच्या खासदारकीचे तिकीट देत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पुण्याचे खासदार बनविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची कुजबूज सुरू आहे.

Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Jagdish Mulik
Murlidhar Mohol News : "जलने वालो को खबर कर दो, अब...", मोहोळांनी कोणाला दिला 'हा' इशारा?

राज्यात महायुतीचे जागावाटपाचे घोडे अजूनही अडले आहे. राज्यातील 48 पैकी 45 जागा महायुतीच्या (Mahayuti) पारड्यात पडाव्यात, यासाठी अधिकाधिक जागा लढण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठी बड्या नेत्यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकडा मुंडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, राहुल नार्वेकर आदी नेत्यांच्या नावांची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातून मोहोळ आणि मुळीक यांच्यासह सुनील देवधर, मानकरही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच आता चंद्रकांतदादांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे (Kothrud) आमदार आहेत. ते मूळचे कोल्हापूरचे असल्याने त्यांच्या उमेदवारीवरून सुरुवातीला बरीच नाराजी निर्माण झाली होती. बाहेरचे उमेदवार म्हणून विरोधकांकडून जोरदार प्रचारही करण्यात आला होता. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचा पत्ता कट झाल्याने स्थानिकांमध्येही मोठी नाराजी होती, पण त्यानंतर मोठ्या मताधिक्याने दादांचा विजय झाला.

आता लोकसभा निवडणुकीतही दादांना तिकीट देत भाजप धक्का देऊ शकते. पण दादा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार नसल्याचे समजते. त्यांनी मोहोळांच्या नावाला पसंती दर्शवल्याची चर्चा आहे. मोहोळांनी मतदारसंघात आधीपासून विविध उपक्रम, फ्लेक्सबाजीतून प्रचाराला सुरुवात केली आहे. पण कोथरूडमधील मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवल्यानंतर भाजप त्याच मतदारसंघातील मोहोळांना लोकसभेवर धाडणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

R

Murlidhar Mohol, Chandrakant Patil, Jagdish Mulik
Adhalrao Vs Kolhe: 'पोपट' म्हणणाऱ्या आढळरावांची कोल्हेंनी काढली पिसं; हा तर जनतेचा अवमान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com