Murlidhar Mohol
Murlidhar Moholsarkarnama

Murlidhar Mohol News : "जलने वालो को खबर कर दो, अब...", मोहोळांनी कोणाला दिला 'हा' इशारा?

Murlidhar Mohol Latest News : मागील आठवड्यात महापालिकेच्या आवारात लोकसभेच्या शर्यतीत असलेल्या मोहोळांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती.
Published on

आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्ह्यात येत असलेल्या पुणे शहर, बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीने या मतदारसंघांतून नक्की कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यातच माजी महापौर मोहोळ यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सूचक इशारा दिला आहे.

Murlidhar Mohol
Pune Political News : पुण्यातले खासदार लयभारी; खर्चासाठी एकापेक्षा एक वरचढ... कुणी किती निधी संपवला?

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी पाच ते सहा जण इच्छुक आहेत. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ), भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रचारक सुनील देवधर, फ्रेंडस ऑफ भाजपचे शिवाजी मानकर यांचा समावेश आहे. पक्षाच्या वतीने आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी गेले काही महिन्यांपासून हे सर्व इच्छुक जोरदार प्रयत्नशील असून, वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राम कथा, हनुमान कथा, आरोग्य शिबिर, मॅरेथॉन अशा कार्यक्रमांचे आयोजन सर्व इच्छुकांच्या वतीनं केले जात आहे. मतदारांसाठी केलेल्या कामांची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यासह विकासकामांचा आढावादेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे.

पुण्यात काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळला आहे. यातून पदाधिकाऱ्यांमध्ये बॅनर वॉर सुरू झाले आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या आवारात लोकसभेच्या शर्यतीत असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती.

Murlidhar Mohol
Pune Congress News : बागुलांच्या लेटर बॉम्बनंतर तिवारींचा नाराजीचा संदेश! पुणे काँग्रेसमध्ये पुन्हा उफाळून आली गटबाजी

"स्टँडिंग दिली, महापौर दिलं..! सरचिटणीस बनवलं..!! खासदारकी पण देणार...? आता बास झालं.... 'तुला नक्की पाडणार' कष्टाळू भाजप कार्यकर्ते", असं बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. पण, हे बॅनर नक्की कोणी लावलं हे समजू शकलं नाही. या बॅनरवर प्रतिक्रिया देताना मोहोळ यांनी "रात गई बात गई" अशी प्रतिक्रिया दिली होती. पण, अशातच मोहोळ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मोहोळांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टेटसवर स्टोरी शेअर करण्यात आली होती. "जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है," असा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. उमेदवारांच्या यादीत मोहोळांचे नाव चर्चेत आल्यानं पक्षातील विरोधकांना इशारा देण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, मोहोळांचा हा इशारा नेमका कुणासाठी होता, हे अद्याप समजू शकलं नाही.

( Edited By : Akshay Sabale )

R

Murlidhar Mohol
Pune Loksabha Election 2024 : भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याअगोदर मुळीकांची फडणवीसांशी मुंबईत चर्चा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com