Pune Political News : पुण्यातले खासदार लयभारी; खर्चासाठी एकापेक्षा एक वरचढ... कुणी किती निधी संपवला?

Lok Sabha MP : लोकसभेच्या चार आणि राज्यसभेच्या दोन खासदारांनी केलीत कोट्यावधींची विकासकामे. सर्वाधिक निधी प्रकाश जावडेकर यांनी खर्च केला आहे.
Pune Political News
Pune Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आपल्या खासदारांनी पाच वर्षांत किती विकासकामे केली, त्यासाठी किती निधी खर्च झाला, यावरून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन मतदारांकडून केलं जातं. पुणे जिल्ह्यातील (Pune Political News) शिरूर आणि बारामती येथील खासदार पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. मावळच्या खासदारांचे अद्याप तळ्यात मळ्यात आहे, तर पुण्यातून नवीन उमेदवार खासदारकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, 2019 ला निवडून आलेल्या खासदारांनी किती विकासनिधी खर्च केला, याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) चार, राज्यसभेच्या दोन अशा सहा खासदारांनी 2019-24 या पाच वर्षांच्या कार्यकाळात 109 कोटींचा खर्च केला आहे. त्यामध्ये पुण्याचे (Pune) दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना 2019 ते 2023 या दरम्यानच्या कालावधीमध्ये 12 कोटी 68 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी 11 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून तो खर्च करण्यात आला आहे. मात्र, बापट यांच्या निधनामुळे त्या निधीतील 68 लाख रुपयांचा खर्च हा अद्याप अखर्चित राहिला आहे.

Pune Political News
Dattatray Bharne News : 'समजनेवाले को इशारा ही काफी...' ; आमदार भरणेंचं सूचक वक्तव्य!

खासदार ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात, त्या भागातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेता हा निधी खर्च करण्याची शिफारस किंवा त्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित खासदारांकडून केंद्र सरकारला करण्यात येते. त्यानुसार, प्रत्येक खासदाराला ठराविक निधी उपलब्ध केला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या खासदारांना 17 कोटींपर्यंत निधी वर्षाला, तर राज्यसभेच्या खासदारांना 23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. दरम्यान, कोविड काळामध्ये 2020-21 मध्ये खासदारांना देण्यात येणारा स्थानिक विकास निधी स्थगित करण्यात आला होता. तसेच 2021-22 मध्ये अवघा दोन कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

पाच वर्षांचा लेखाजोखा पाहिला तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 16 कोटी 85 लाख शिरूरच्या खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 16 कोटी 90 लाख मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी 16 कोटी 89 लाख इतका निधी मतदारसंघातील विकासकामांसाठी खर्च केला आहे. राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर (prakash javdekar) यांनी 23 कोटी 40 लाख तर खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी 23 कोटी दहा लाखांचा निधी खर्च केला आहे.

(Edited By - Rajanand More)

R

Pune Political News
Yashwant Sahakari Sakhar Karkhana Election Results: यशवंतच्या सभासदांनी अखेर कारभाऱ्यांना जागा दाखवलीच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com