Lok Sabha Election 2024 News : गट-तट, हेवेदावे विसरून काँग्रेस लागली कामाला; पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका

Congress News : काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आठवडाभर शहरभरात मॅरेथॉन बैठका. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आठवडाभर शहरभर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणुका जवळ आल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आणि हेवेदाव्यांच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गट सक्रिय होऊन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळतो. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे गट-तट विसरून कामाला लागण्याचे धोरण अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निश्चित केले आहे. या दृष्टिकोनातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुढील आठवडाभर शहरभर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत.

आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. जुने-जाणते कार्यकर्ते एकत्रित येऊन काँग्रेस संघटना मजबूत करण्याकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये काँग्रेसची झालेली पीछेहाट यंदा तरी थांबेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाकडून केली जात आहे. (Lok Sabha Election 2024 News)

Pune Congress
Sangram Thopte News : संग्राम थोपटेंची साथ, ताई की वहिनीला ? थेटच सांगितले...

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार आणि कसबा विधानसभा निरीक्षक दीप्ती चवधरी, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, संजय बालगुडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पुढील आठवडाभरात शहरातील आठ मतदारसंघांमध्ये या बैठका होणार आहेत. विधानसभा मतदारसंघाबरोबर ब्लॉक स्तरावर बूथ लेवलवरती देखील बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना वरिष्ठांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत.

त्यामुळे पुढील आठवड्यावर शहराच्या प्रत्येक भागामध्ये काँग्रेसच्या या बैठका सुरू राहणार आहेत. या आठवडाभरात कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचे वातावरण निर्मिती आणि आगामी निवडणुकीसाठी उत्साह निर्माण करण्याचं काम या बैठकीच्या माध्यमातून होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची झालेल्या बैठकीमध्ये उमेदवार कोणताही असला तरी काँग्रेस कार्यकर्ते एक दिलाने उमेदवारच काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वीस जण इच्छुक आहेत. यामध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही यादी शहर काँग्रेसकडून प्रदेश समितीला पाठवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसकडून देखील उमेदवाराची चाचपणी करण्यात यासाठी सर्वे करण्यात आला होता.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील जो उमेदवार सक्षम असेल त्याला उमेदवारी देण्याचे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. भाजपने नुकताच लोकसभेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये काँग्रेसची देखील पहिली यादी येण्याची शक्यता आहे. या पहिल्याच यादीमध्ये पुण्याच्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते असं बोलले जात आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Pune Congress
Pune Congress News : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com