Pune Congress News : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न; काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले.
Pune Congress News
Pune Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सिंघू बॉर्डर येथे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र मोदी सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व चौकातील झाशी राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसच्या मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते काही तरी चुकीचे कृत्य करणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बालगंधर्व चौकात बंदोबस्त ठेवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Congress News
Prakash Ambedkar : 'एकला चलो'चा नारा? प्रकाश आंबेडकर मनातलं सगळं बोलणार?

घोले रोड येथून सोमवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत काँग्रेसचे आठ ते दहा कार्यकर्ते झाशी राणी चौकात आले. त्यांच्याकडे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांचा पुतळा होता. त्यांनी हा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश ऊर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधराम आणि राहुल दुर्योधन शिरसाट या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलिस (Police) ठाण्यात नेले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Pune Congress News
Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com