Sita Soren Join Bjp: 'एनडीए'ची ताकद वाढणार; झारखंडमध्ये भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न', सोरेन कुटुंबात फूट

LokSabha Election 2024 : सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पक्षावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी पत्र लिहून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
Sita Soren Join Bjp
Sita Soren Join BjpSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand News : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 'चारशे पार'चा नारा देत महाविजयाचा संकल्प केला आहे.यासाठी साम-दाम-दंड- भेद अशा सर्वच पर्यायांचा वापर करत फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. एनडीएची ताकद वाढविण्यासोबतच प्रादेशिक पक्षांना सामावून घेण्यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहे.

याचवेळी केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर करुन भाजप आपला राजकीय हेतू साध्य करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमी केला जातो.यातच काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अटक केल्यामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच आता भाजपने मोठा डाव टाकला आहे.सोरेन यांच्या भावजय सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Sita Soren Join Bjp
Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'तुतारी' देशभर वाजणार, पण 'घड्याळा'ची धाकधूक; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

आमदार सीता सोरेन (Sita Soren News) यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचा राजीनामा दिला आहे.यासोबतच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सीता ह्या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सून असून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावजय आहेत. यामुळे सोरेन कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे.

सीता सोरेन यांनी दिल्ली येथे भाजप प्रवेश केला.त्या दुमका येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.त्या आतापर्यंत तीनदा आमदार राहिल्या आहेत. हेमंत सोरेन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या पक्षावर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीता सोरेन यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्यापूर्वीच पक्षावर गंभीर आरोप केला आहे.त्यांनी पत्र लिहून पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पतीच्या निधनानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला सातत्याने डावलले गेले.पक्षात आणि कुटुंबात दुजाभाव करण्यात आला. हे आमच्यासाठी वेदनादायी होते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले. ज्याला सीता सोरेन यांनी कडाडून विरोध केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Sita Soren Join Bjp
Lok Sabha Election 2024 : नांदेडवर 'फतेह' मिळवण्यासाठी MIM चे 'जो बोले सो निहाल...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com