Sunetra Pawar News : केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून समस्या सोडविणार; सुनेत्रा पवारांची ग्वाही !

Baramati Lok Sabha : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार ताकद लावली आहे.
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे. तशी प्रचाराची रंगत वाढत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष लागले आहे.

या मतदारसंघात आतापर्यंत सुळे यांना संधी दिली. मात्र, त्यांनी काहीही काम केले नाही. देशात नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याने त्यांच्याच विचाराचा खासदार बारामतीमधून संसदेत गेला पाहिजे. यासाठी महायुतीच्या उमेदवारी सुनेत्रा पवार यांना विजयी करा, असे आवाहन अजित पवार करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये जोरदार ताकद लावली आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. बारामतीची जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील नेत्यांनीदेखील जोरदार रणनीती आखली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar Sabha : कोल्हेंसाठी शरद पवार घेणार सहा सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली !

महायुतीकडून बारामतीची (Baramati) उमेदवारी मिळालेल्या सुनेत्रा पवार यांनीदेखील मतदारसंघात जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पदयात्रा, रॅली, जाहीर मेळावे यांच्या माध्यमातून हा प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ सुनेत्रा पवार यांनी पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी परिसरात भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मतदारसंघात कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्यासाठी अजितदादा खंबीरपणे तुमच्या पाठिशी उभे असतात. सतत सकारात्मक असतात. मीदेखील केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतर्क राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केंद्रात आणि राज्यात (Maharashtra) एकाच विचाराचे सरकार असेल तर कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक करणे सोपे जाते. देश सुरक्षित हातात राहण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. महायुतीने हा निर्धार केला असून, यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी भूमिका घेणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचाच भाग असून, आपले उमेदवारी चिन्ह असलेले घड्याळ हे तळागाळात पोहाेचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

R

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Dhairyasheel Mohite Patil News : 'आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती'; धैर्यशील मोहिते-पाटलांचा निंबाळकरांवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com