Baramati Loksabha News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडून दोन गट पडल्यानंतर प्रथमच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे खासदार शरद पवार हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले आहेत. यावेळची निवडणूक वेगळी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुरंदर येथील सभेत शरद पवार यांनी किस्सा सांगितला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. मला एकदा ते म्हणाले, मला बारामतीला यायचं आहे. मी त्यांना म्हटलं जरुर या. मोदी आले, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि प्रसार माध्यमांना म्हणाले, मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो. त्यामुळे मला माझ्या बोटाची काळजी वाटू लागली आहे, असे शरद पवार म्हणताच एकच हशा पिकला.
शरद पवार म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक वेगळी आहे. आम्हाला काळजी आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा वापर अशा प्रकारे करत आहेत. या सरकारला निवडणुकीची प्रक्रियाच नको आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली नाही. पंचायत समिती, नगर पालिकांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. सगळ्या निवडणूका टाळायच्या आणि एका व्यक्तीने सगळा कारभार हातात घ्यायचा हे मोदींचं सूत्र आहे.
ज्या दिवशी विधानसभा आणि लोकसभा याचाही कारभार सुरु झाला नाही, तर लोकशाही संकटात आलीच म्हणून समजा, असेही ते म्हणाले. इस्त्राईल दौऱ्याचा किस्सा सांगताना शरद पवार म्हणाले, मी केंद्रात मंत्री होतो, तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मला इस्त्राईलला जायचं होतं, केंद्र सरकारने मला जबाबदारी दिली होती. इस्रायल हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे माझा जायचा कार्यक्रम ठरला.
हे मोदींना कळालं की मी इस्त्राईलला चाललो. त्यांनी मला फोन आला आणि मलाही इस्त्राईलला यायचं आहे. तुमच्या शिष्टमंडळात माझा समावेश करा. मी ठीक आहे म्हटलं. आम्ही इस्त्राईलला गेलो. दोन दिवसांच्या दौऱ्यात आम्ही शेतीचं निरीक्षण केलं. त्यानंतर मला मोदी म्हणाले की, मी मागे थांबतो. मागे राहून त्यांनी काय केलं, याची याची चौकशी केली. मोदींनी लष्करशाहीची शक्ती कशी आहे, याची माहिती ते घ्यायला ते गेले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्ही शेती बघायला गेलो होतो. यांनी ही पण माहिती मिळवली. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. असेही शरद पवार म्हणाले. घटनेत बदल करण्यासाठी सत्ता द्या, असं कर्नाटकमधील मंत्र्याने बोललेल्या वक्तव्यावरून लक्षात येते. मोदींच्या सरकारमधील मंत्री जाहीरपणे सांगत आहेत.
त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार उद्ध्वस्त होण्याचीच चिन्हं आहेत, असेही श्री. पवार यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, माणसाची चोरी पाहिली, परंतु पक्षाची चोरी पाहिली नाही. फडणवीस म्हणतात मी दोन पक्ष फोडले. हे काय कर्तृत्व आहे का, असा सवाल त्यांनी केला.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.