Shirur Lok Sabha Constituency : आधी कोल्हेंचा प्रचार केला आता आढळराव पाटलांसाठी गुडविल; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Pune News : स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सुरू होती. त्यातील छत्रपती संभाजीमहाराजांच्या भूमिकेचा मोठा हातभर सेलिब्रिटी कोल्हेंच्या विजयात लागला.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

Pune Political News : शिरुर लोकसभेची यावेळची लढत ही आघाडी आणि महायुतीच्या अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने ती खूपच अटीतटीने होत आहे. तेथील आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांची महिला व तरुणांत अधिक क्रेझ आहे.तर,युतीचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांची लहान मुलांतही क्रेझ सल्याचा प्रत्यय आठवड्यात दोनदा आला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सुरू होती. त्यातील छत्रपती संभाजीमहाराजांच्या भूमिकेचा मोठा हातभर सेलिब्रिटी कोल्हेंच्या Amol Kolhe विजयात लागला. महिलांनी त्यांना भरभरून मतदान केले होते. तर, त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे तरुणांत ते लोकप्रिय आहेत. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी आढळराव हे लहान मुलांतही लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे.

गेल्याच आठवड्यात आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना सुधीर पंढरीनाथ थोरात या शहीद जवानाचा पाच वर्षाचा केजीतील मुलगा यश याने हटके शुभेच्छा दिल्या. चॉकेलेटसह जनतेची सेवा करण्याची संधी तुम्हाला पु्न्हा मिळो, अशा शुभेच्छा स्वतः बनविलेल्या ग्रिटींग कार्डमधून त्याने दिल्या होत्या. त्यामुळे उमेदवार भारावून गेले होते.

Shivajirao Adhalrao Patil
Narendra Modi News : भटकत्या आत्म्यामुळं राज्यात अस्थिरता; PM मोदींचा नेमका रोख कुणाकडे?

शिरुर Shirur तालुक्यातील गावभेट दौऱ्यात आढळरावांना शुभेच्छाच नाही, तर तिसरीतील शिवांश विनोद भालेराव याने चक्क सहा महिन्यांपासून साठवत असलेली पिगी बँक सुपूर्द केली. यावर शिवांशचे वडील विनोद भालेराव म्हणाले, चांगल्या ठिकाणी वापरण्यासाठी बचत कर, असे शिवांशला सांगितले होते. त्यातून सहलीला जाण्यासाठी आवश्यक असलेला टेंट घेण्याचे ठरले होते. मात्र,आढळरावांना ते देऊ असे सांगताच कसलेही आढेवेढे न घेता तो तयार झाला, हे विशेष, असेही भालेराव यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्यावेळी विनोद भालेराव Vinod Bhalerao यांनी कोल्हेंना पहिला हार घालून त्यांचा प्रचार केला होता. यावेळी अचानक यू टर्न कसा घेतला, अशी विचारणा त्यांना केली. त्यावर भालेराव म्हणाले, पाच वर्षात त्यांनी एक रुपयाचा निधी आमच्यासाठी आणला नाही. खासदार म्हणून फेल ठरले. आमचे मत वाया गेले. म्हणून यावेळी निर्णय बदलला, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्योगपती कोट्यधीश उमेदवाराला मुलाच्या पिग्गी बँकेतील काही हजार रुपये किती मदतीचे ठरतील, त्याची खरंच गरज त्यांना पडेल का, यावर भालेराव यांनी, गुडविल म्हणून ते दिले असल्याचे सांगितले. तसेच या वैचारिक लढाईत खारीचा वाटा आणि भविष्यासाठी चांगला माणूस निवडून आला पाहिजे हा हेतू त्यामागे आहे,असे ते म्हणाले.

Shivajirao Adhalrao Patil
Narendra Modi On Congress : 'कर्नाटक पॅटर्न'वरून मोदींचा काँग्रेसला कडक इशारा; 'मी जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीत...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com