Lok Sabha Election 2024 : मावळात बापाला अन् बारामतीत पतीला फिरावं लागतंय...; राऊतांची जहरी टीका!

Lok Sabha Election 2024 : अजित पवारांवर टीका करताना नेहमी हातचं राखून टीका करणारे राऊतांना आज तुफान हल्लाबोल केला.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama

Pune News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एकेकाळचे आपले राजकीय सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. अजित पवारांवर टीका करताना नेहमी हातचं राखून टीका करणारे राऊतांना आज तुफान हल्लाबोल केला. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आणि संजय राऊत यांच्यात टीका-टिप्पण्णी टोकाल जाण्याची चिन्हे दिसत आहेत. (Lok Sabha Election 2024)

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या जनसंपर्क निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Sanjay Raut News : संजय राऊतांनी धरले धारेवर; जिंकण्याची खात्री आहे तर फडणवीस, अजित पवार धमक्या का देत आहेत?

संजय राऊत म्हणाले, "मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2019 च्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता आणि आज त्याच श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळला आले होते. इतकेच नाही तर मावळमध्ये श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार बारणे यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. यामुळे मावळमध्ये बापाला आणि बारामतीमध्ये पतीला प्रचारात उतरावे लागते याचा अर्थ पराभव नक्की आहे, असे म्हणत अजित पवार यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

निवडणूक आयोगावर वार -

निवडणूक आयोग ही भाजपाची स्टँडर्ड शाखा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेलिकॉप्टर, शासकीय यंत्रणांचा गैरवापर प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्यावर निवडणूक आयोग कोणतेही कारवाई करत नाही, अशी टीका देखील संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार -

राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) 35 हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी दाखवला आहे. नांदेडच्या ज्या एका जागेसाठी भाजपने अशोक चव्हाण यांना आपल्याकडे घेतलं होत, ती नांदेडची जागा देखील आम्ही जिंकत आहोत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com