Ajit Pawar News : "अजित पवारांनी 'भटकती आत्मा' कसे ऐकून घेतले?"

Narendra Modi Vs Sharad Pawar : पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे 'भटकती आत्मा' केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.
ajit pawar sharad pawar narendra modi
ajit pawar sharad pawar narendra modi sarkarnama

Pune News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) जर शरद पवार हयात असताना त्यांचा 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत असतील, तर त्या सभेला उपस्थित असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते कसं ऐकून घेतलं? रक्त, गोत्र, कुटुंब एक असतानाही शरद पवार यांचा विश्वास राखू न शकणारे अजित पवार हे तर आम्हाला कधी पण बुडवायला तयार आहेत, अशी बोचरी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील ( Baramati Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( शरदचंद्र पवार ) उमेदवार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यासाठी दौंडमध्ये प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

"...अन् अजित पवार शांत राहिले"

सुषमा अंधारे ( Sushma Anadhare ) म्हणाल्या, "शरद पवार ( Sharad Pawar ) यांना पराभूत करण्याचा विचार अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी राजकारणात भाग म्हणून करावा. मात्र, ज्यांच्याबरोबर अनेक वर्षे राहिला, अंगाखांद्यावर खेळले, ज्यांनी बोट धरून शाळेत सोडलं, त्या शरद पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले जात असताना अजित पवार शांत राहिले."

"मोदींचा नाद पूरा केल्याशिवाय राहणार नाही"

"'भटकती आत्मा' कोणाची आहे? नरेंद्र मोदी कुठे-कुठे भटकून आले आणि त्याची फलश्रूती काय आहे? हे देखील सांगायला हवं. महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप चालतील आणि निवडणुकीत आमचं जे व्हायचे ते होऊ द्या. पण, बाहेरचा कोणी येऊन आमची अस्मिता आणि प्रेरणास्थानाबद्दल अपशब्द काढत असेल तर महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांचा नाद पूरा केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला.

ajit pawar sharad pawar narendra modi
Ajit Pawar News : 'भटकती आत्मा' कोणाला म्हटलं हे पंतप्रधानांना विचारणार? अजित पवार म्हणाले...

"फडणवीस चाणक्य नाहीत"

"भाजपने ज्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ज्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) धाडी पडल्या त्या लोकांचा ते आता प्रचार करीत आहेत. निवडणुकीत मतदारांनी खोके घेणारे, पक्ष फोडणारे आणि कारवाईला घाबरून पक्षांतर करणाऱ्यांना नाकारून स्वाभिमानी उमेदवारांना निवडून द्यावं. देवेंद्र फडणवीस हे चाणक्य नाहीत. कारण, त्यांनी कोणा नेत्याला घडविलं नाही. दुसऱ्यांचे नेते मात्र चोरले," असा हल्लाबोल अंधारेंनी केला आहे.


( Edited By : Akshay Sabale )

ajit pawar sharad pawar narendra modi
Amol Kolhe On Ajit Pawar : बापाला आव्हान द्यायचं नसतं, कोल्हे यांचा अजितदादांना टोला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com