Pune Loksabha Election
Pune Loksabha Election Sarkarnama

Loksabha Election 2024 : हलगर्जीपणा नडला आणि टक्का घटला;....यामुळे कमी झाले पुण्याचे मतदान

Pune Loksabha Election : अनेक ठिकाणी चुकीची मतदार यादी आणि मतदारसंघांमध्ये यादीची फोड करताना बदललेले मतदान केंद्र याचा नाहक त्रास मतदारांना सहन करावा लागला. यामागे प्रशासनाचा गलथान कारभार असल्याचं आता समोर आला आहे.
Published on

Pune News : लोकसभा निवडणुकी संदर्भात पुण्यात जिल्हा निवडणूक शाखेच्या हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदारांचे नाव दुरुस्त करण्याचे काम मागील काही महिन्यांपासून ठप्प असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मतदारांनी भरून दिलेले नमुना नंबर 8 तसेच ओळखपत्राच्या दुरुस्तीसाठीची वेबसाईट बंद ठेवल्याने अनेक नोंदी तसेच दुरुस्तीची कामे रखडल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यापासून अनेक नागरिकांना वंचित राहावे लागले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीतून (Voting List) नावे गायब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले, तसेच अनेक ठिकाणी चुकीची मतदार यादी आणि मतदारसंघांमध्ये यादीची फोड करताना बदललेले मतदान केंद्र याचा नाहक त्रास मतदारांना सहन करावा लागला. यामागे प्रशासनाचा गलथान कारभार असल्याचं आता समोर आला आहे. (Loksabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकांना मतदार यादीतील नाव, पत्ता, वय यामध्ये दुरुस्तीसाठी नमुना नंबर आठ हा फॉर्म भरून दिला होता. परंतु ही वेबसाईट बंद असल्याने या अर्जांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. यामुळे एकट्या इंदापूर तालुक्यामध्ये तब्बल आठ हजार मतदारांच्या दुरुस्त्या रखडल्याचे समोर आले असून या मतदारांना लोकसभा निवडणुकीत (Election commission) मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागलं आहे.

Pune Loksabha Election
Jalna Loksbaha : अपक्ष मंगेश साबळे कोणाचा खेळ बिघडवणार ? काळे की दानवे ...

अनेकांनी ऑनलाइन अर्ज भरून देखील त्यांना मतदान ओळखपत्रदेखील मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीचे कामकाजात तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये कर्मचारी गुंतून पडल्याने या कामाकडे दुर्लक्ष झाले असून फटका मतदानाला बसला आहे. मतदानाचा टक्का घटला आहे. दरम्यान मतदार याद्या आणि नावांमधील दुरुस्तीसंदर्भात आलेले अर्ज त्यावर करावयाची कार्यवाही तसेच बंद असलेली वेबसाईट कधी सुरू होणार याबद्दल अद्यापही जिल्हा निवडणूक शाखेने कोणताही खुलासा केलेला नाही.

याबाबत एका राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मार्च 2024 पर्यंत अनेकांची नावे मतदार यादीत होती तसेच त्यांना मतदान कार्डही दिले होते, परंतु मतदानप्रसंगी या मतदारांची नावे कशी गायब झाली. या प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Pune Loksabha Election
Election News : सहकारात निवडणुकाचं वावटळ उठणार, लोकसभेच्या निकालानंतर 291 संस्थांच्या निवडणुका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com