Election News : सहकारात निवडणुकाचं वावटळ उठणार, लोकसभेच्या निकालानंतर 291 संस्थांच्या निवडणुका

loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे या निवडणुका मागे पडल्या होत्या. चार जूननंतर गावगाडातल्या विकास संस्था, सोसायट्या, पाणी पुरवठा संस्थेच्यां निवडणुका पार पडणार आहेत.
Election News
Election NewsSarkarnama

Kolhapur News : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल सुरू आहे. त्यातच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) तिसऱ्या टप्प्यात पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाल आहे. मतदान पार पडल्यानंतर बऱ्यापैकी लोकसभेचे वारे या दोन्ही मतदारसंघात संथ गतीने वाहत आहे.

4 जून रोजी निकाल झाल्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराच्या निवडणुकींचे वावटळ उठणार आहे. जिल्ह्यातील 229 संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे या निवडणुका मागे पडल्या होत्या. चार जूननंतर गावगाडातल्या विकास संस्था, सोसायट्या, पाणी पुरवठा संस्थेच्यां निवडणुका पार पडणार आहेत.

Election News
Supreme Court on ED : …तर ‘ईडी’ आरोपीला अटक करू शकत नाही! सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण हे बऱ्यापैकी सहकारी संस्था आणि सोसायट्यांवर अवलंबून आहे. जिल्ह्यातील राजकारण हे सहकारावर आधारित असल्याने सहकाराच्या विविध संस्था, सोसायटी आणि पाणीपुरवठा संस्था या महत्त्वाच्या आहेत.

गावगाड्यातल्या या संस्था ताब्यात असतील तर जिल्ह्यातील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी त्याचा महत्त्वाचा उपयोग होतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 229 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणूक लागल्यानंतर या संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लोकसभेच्या निकालानंतर या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.

सहकारी संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेकांनी तयारी करून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत प्रवास केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने हा कार्यक्रम जैसे ते ठेवण्याचे आदेश सहकार प्रशासनाकडून मिळाले होते. मात्र निकालानंतर पुन्हा एकदा गाव गाड्याचं वातावरण राजकारणाने ढवळून निघणार आहे. जिल्ह्यातील ‘ब’ वर्गवारीतील ८७ व ‘क’ वर्गवारीतील ७८ संस्थांची निवडणूक ‘जैसे थे’ आहे. सर्वाधिक म्हणजे ‘ड’ वर्गवारीतील १२६ संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या थांबला आहे.

Election News
Chandrababu Naidu : देशात मोदी मूड, एनडीए 400+ जागा जिंकेल; अंबाबाईच्या दर्शनानंतर चंद्राबाबू नायडूंचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com