Sharad Pawar News : जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, फडणवीसांच्या चार्टर विमानाचा खर्च वाया जाणार?

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर नेते उत्तम जानकर यांना महत्त्व प्राप्त झालं आहे.
devendra fadnavis uttam jankar sharad pawar
devendra fadnavis uttam jankar sharad pawarsarkranama

माढा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Election 2024 ) राजकारण सतत हेलकावे खात असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार गट ) नेते, उत्तम जानकर ( Uttam Jankar ) यांनी विमानवारी करूनही भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय घेतला नाही. अकलूजमधील कट्टर विरोधक मोहिते-पाटील यांच्याशी जानकर हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली आहे. या वेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) सुद्धा उपस्थित होते.

माळशिरसमध्ये मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर ( Uttam Jankar ) हे पारंपरिक विरोधक. मात्र, लोकसभा निवडणुकीनिमित्तानं माढ्यात राजकारण सतत बदलत चाललं आहे. मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपसमोर संकट वाढत चाललं आहे. यातच गतवेळी 2019 मध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsinha Naik Nimbalkar ) यांच्यासाठी मैदानात उतरलेले उत्तम जानकर हे वेगळ्या भूमिकेत असून, त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे जानकरांची नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी ( 15 एप्रिल ) खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील हे विशेष विमानानं नागपूरला गेले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या भेटीनंतर जानकर यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचं जाहीर केलं, पण कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊनही निर्णय दिला नाही.

यातच आज जानकरांनी शरद पवार यांच्याबरोबर पुण्यातील 'मोदीबाग' निवासस्थानी चर्चा केली आहे. चर्चेतनंतर प्रसारमाध्यमांशी जानकरांनी संवाद साधला. "मोहिते-पाटील आणि आमच्यातील वैर संपून निवडणुकीत एकत्र यावं, असं शरद पवारांचं मत होतं. पण, आम्ही एकमेकांविरोधात लढलो असल्यानं अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडण्याबाबत एक बैठक झाली आहे. दोन-तीन दिवसांत दुसरी बैठक होणार आहे. एकमेकांना सहकार्य होऊ शकते का? मोहिते-पाटील आणि आमच्यातील वैर कसं थांबणार आणि काही कामांबद्दल बैठकीत चर्चा झाली," अशी माहिती जानकरांनी दिली.

"शरद पवारांबरोबर जावं, अशी आमच्या गटातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मोहिते-पाटील आणि आम्ही एकत्र आलो, तर विधानसभेला मी उमेदवार असू शकतो," असे सूचक संकेत उत्तम जानकरांनी दिले.

devendra fadnavis uttam jankar sharad pawar
Ajit Pawar Vs Mohite Patil : "मोहिते-पाटील स्वार्थी अन् मतलबी," अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

नागपूरला जाण्यासाठी फडणवीसांनी पाठविलेल्या विमानाचा खर्च वाया जाणार का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, "विमानात आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी चर्चा झाली. विमानात झालेले मुद्दे 19 एप्रिलला कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात येणार आहेत, मग कार्यकर्ते घेतील, त्या निर्णयाबरोबर राहणार आहे. 'तुतारी' हाती घ्यावी, अशी काहींची इच्छा आहे. पण, अन्य काही कार्यकर्त्यांचेही मतमतांतरे असू शकतात. विरोधकांबरोबर जाणं हे थोडं अवघड काम आहे. मात्र, 19 एप्रिलच्या बैठकीत त्याबद्दल निर्णय होईल. मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून मी अजितदादांच्या पक्षात आहे," असं जानकरांनी म्हटलं.

R

devendra fadnavis uttam jankar sharad pawar
Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंचे मोहिते पाटलांना प्रत्युत्तर; ‘सोलापूरकरांनी माझं पार्सल दिल्लीला पाठविण्याचं ठरवलंय’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com