Mohite Patil Vs Satpute : सातपुतेंचे मोहिते पाटलांना प्रत्युत्तर; ‘सोलापूरकरांनी माझं पार्सल दिल्लीला पाठविण्याचं ठरवलंय’

Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघाची मोट आज उद्या आपल्याला बांधलेली दिसेल. माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर हे आमच्यासोबत येत आहेत. हे आता ठरलं आहे, त्यामुळे माळशिरस तालुक्यातून भाजपला मताधिक्य निश्चितपणे मिळेल
Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Dhairyasheel Mohite Patil-Ram satputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 April : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हिणवू नका. मला कितीही शिव्या द्या. पण माझ्या आई वडिलांवर टीका करू नका, असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी रविवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. त्या सभेत बोलताना ‘विजयदादांनी सांगितल्यामुळे तुम्हाला एका रात्रीत आमदार केले. पण, एका रात्रीत तुमचं पार्सल पुन्हा बीडला पाठवू’, असा इशारा मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना दिला होता. मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेला आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Narayan Patil Resign Shivsena : मोहिते पाटलांनंतर माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का; माजी आमदार पाटलांचा शिवसेनेचा राजीनामा

मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राम सातपुते म्हणाले, ही मोदीजींची निवडणूक आहे, त्यामुळं कोणी कुठेही गेलं तरी जनता मोदींसोबत आहे. मी एक सामान्य शेतकरी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्यामुळे एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला हिणवण्याचे काम ही लोकं करत आहेत.

माझ्या आई-वडिलांनी या मातीमध्ये रक्त सांडलं आणि घाम गाळून ऊस तोडलेला आहे. त्यामुळे इथल्या मतीमध्ये माझी बांधिलकी आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी ठरवलं आहे की, येत्या 4 तारखेला माझं पार्सल दिल्लीला पाठवायचं आहे. त्या पार्सलमध्ये सोलापूरचे प्रश्न असतील. सोलापूरकरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सोलापुरात उद्योग आले पाहिजेत. सोलापूरच्या शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे. या भागामध्ये जिथं पाणी नाही, तिथं पाणी न्यायचं आहे. उजनी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवायची आहे, असे सातपुते यांनी म्हटलं आहे.

Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Solapur Vanchit : सोलापुरात ‘वंचित’ला धक्का; जिल्हाध्यक्षांनी सोडली आंबेडकरांची साथ

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल मला कायम आदर आहे आणि भविष्यातही तो राहील, असे सांगून सातपुते म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघाची मोट आज उद्या आपल्याला बांधलेली दिसेल. माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर हे आमच्यासोबत येत आहेत. हे आता ठरलं आहे, त्यामुळे माळशिरस तालुक्यातून भाजपला मताधिक्य निश्चितपणे मिळेल.

एक गरीब, सर्वसामान्य, ऊसतोड कामगारांच्या पोराला हिणवणे ही येथील प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे. मला तुम्ही शिव्या दिल्या तरी त्या मी फुलं म्हणून स्वीकारेन. पण, माझ्या आई-वडिलांवर टीका करू नका, असे आवाहनही सातपुते यांनी केले.

R

Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Madha Lok Sabha : फडणवीसांनी हाती घेतली माढ्याची सूत्रे; उत्तम जानकर विशेष विमानाने मुंबईत दाखल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com