Lok Sabha Election 2024 : वंचितने 'मावळ'मध्ये खेळले पुन्हा आगरी कार्ड; दिला घाटाखालचा उमेदवार...

Prakash Ambedkar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून वंचित `मध्ये आल्या होत्या आणि कालच त्यांची ही उमेदवारी जाहीर झाली.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Maval Lok Sabha News : मावळ लोकसभेत आतापर्यंत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट म्हणजे दुरंगी लढत होती. मात्र,वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार काल जाहीर केल्याने या वेळीही तेथे तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, वंचितच्या एंट्रीचा फटका युती आणि आघाडी अशा दोघांनाही बसणार असून, विजयी उमेदवाराचे लीडही कमी होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होऊन तीन दिवस झाल्यानंतर 'वंचित 'ने आपल्या दोन उमेदवारांची सातवी यादी काल (ता. 20) जाहीर केली. त्यात 'मावळ'मधून त्यांनी कर्जत (जि.रायगड) येथील माधवी नरेश जोशी यांना उमेदवारी दिली. त्या कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून वंचित `मध्ये आल्या होत्या आणि कालच त्यांची ही उमेदवारी जाहीर झाली. राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभेच्या निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : खुद्द आंबेडकर परत आले तरी..! संविधानाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन,अशी प्रतिक्रिया जोशी यांनी 'सरकारनामा'ला दिली. लोकसभा निवडणुकीची वर्षभर तयारी सुरु होती,असे त्या म्हणाल्या. दोन-तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काल उमेदवारी मिळताच लगेच आज त्यांनी प्रचारालाही सुरवात केली. त्यांच्या रुपाने 'वंचित'ने 'मावळ'मध्ये पुन्हा आगरी कार्ड खेळले आहे. गतवेळी त्यांनी घाटाखालील रायगड जिल्ह्यातील आगरी समाजाचे राजाराम पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांना पाऊण लाख मते मिळाली होती.

Lok Sabha Election 2024
Anandraj Ambedkar News : आनंदराज आंबेडकरांची कोलांटउडी; म्हणाले, 'निवडणूक लढवणारच!'
Lok Sabha Election 2024
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा; भाजपला 'ती' चूक भोवणार !

'मावळ'च्या घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरण या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने आगरी समाज आहे. ही बाब ध्यानात घेऊन 'वंचित 'ने हुषारीने पुन्हा आगरी कार्ड खेळले आहे. आघाडी आणि युतीचे दोन्ही उमेदवार (अनुक्रमे ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील आणि शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे) घाटावरील असल्याने जाणीवपूर्वक `वंचित `ने घाटाखालील उमेदवार दिला आहे.

त्याचा फटका युती व आघाडीच्या उमेदवारांना समसमान बसणार आहे. कारण वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार नसता,तर त्यांना मिळणारी आगरी समाजाची मते ही युती व आघाडीच्या उमेदवारांना मिळणार होती. `एमआयएम `चा उमेदवार तूर्त `मावळ`च्या रिंगणात नसल्याने मुस्लिम आणि दलित मते आता वंचितकडे जातील. त्यामुळे विजयी उमेदवाराचे लीड कमी होणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com