Vasant More News : तात्या लागले कामाला, उभारताहेत 'वॉर रूम'; जरांगे-पाटलांची घेणार भेट

Pune Lok Sabha Election 2024 : 'पुणे की पसंत मोरे वसंत' म्हणत मोरेंनी पूर्वीपासूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती.
manoj jarange patil vasant more
manoj jarange patil vasant moresarkarnama

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'राम राम' ठोकल्यानंतर वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची उमेदवारी ( Pune Lok Sabha Election 2024 ) मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला असून, त्याच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.

'पुणे की पसंत मोरे वसंत' म्हणत मोरेंनी पूर्वीपासूनच लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढवण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यात पक्षांतर्गतच काही नेत्यांनी आडकाठी घातल्याचं कारण देत वसंत मोरे ( Vasant More ) हे मनसेमधून बाहेर पडले. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीकडून आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी मोरे प्रयत्नशील होते. पण, त्यात मोरेंना यश आलं नाही. त्यामुळे मोरे आता अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यासाठी मोरेंनी तयारी सुरू केली असून, निवडणूक वॉर रूम तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पोस्टमध्ये मोरेंनी म्हटलं, "बॅक ऑफिसचे काम चालू केले आहे. तुमची मदत लागेल, मग कराल ना मला मदत आपल्या पुण्याच्या भल्यासाठी..."

काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाजाने एक उमेदवार द्यावा, त्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्याचे त्यांनी म्हटले होते. यानुसार मंगळवारी पुण्यात मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली होती.

manoj jarange patil vasant more
Vasant More News : वसंत मोरे यांची सोशल मीडियावर क्रेज! मात्र राजकीय पक्षांना झालेत नकोसे

या बैठकीत मोरेंनी पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे. पुण्यातून 100 टक्के मी खासदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. "भाजपनं एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या. शिवसेनाही दोन केल्या. यामुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहे," असं मोरेंनी म्हटलं. येत्या 7 तारखेला वसंत मोरे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. मात्र, नंतर मोरे नाराज होऊन या बैठकीमधून तडकाफडकी निघून गेले, असंदेखील समोर आले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

manoj jarange patil vasant more
Vasant More Resign MNS : 'ती' फेसबुक पोस्ट ठरली वसंत मोरे यांच्या राजीनाम्याला कारणीभूत?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com