Vasant More News : 'इस शहर में दबदबा है हमारा...'; वसंत मोरेंचा नेमका कुणाला इशारा ?

Lok Sabha Election 2024 : मनसेमधून बाहेर पडल्यानंतर मोरे हे अद्याप कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी सोडलेली नाही.
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेl. पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' केलेले माजी नगरसेवक वसंत (तात्या) मोरे हेदेखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार, की अपक्ष निवडणुकीला सामोरे जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. Vasant More News

पुणे लोकसभेची निवडणूक (Pune) लढण्यासाठी इच्छुक असलेल्या मोरे यांची फेसबुक पोस्ट आता चांगली चर्चेत आली आहे. आपला एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत 'तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी' अशा आशयाची पोस्ट मोरे यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बॅकग्राउंड म्युझिक बरंच काही सांगून जात आहे. 'देखिए जी ये शहर है तुम्हारा, लेकिन इस शहर में दबदबा है हमारा..' असे शब्द असलेला हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More
Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्याबरोबर वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्ष संघटनेत काम केले आहे. पुणे महापालिकेचे गटनेते, विरोधी पक्षनेते, मनसेचे शहराध्यक्ष अशी विविध पदे मोरे यांनी भूषवली आहेत. पुणे लोकसभेसाठी ते इच्छुक होते. गेल्या एक ते दीड वर्षापासून आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मनसेकडून निवडणूक लढविण्याची तयारीदेखील त्यांनी केली होती.

Vasant More
Omraje Nimbalkar: खासदार ओमराजेंचे विरोधकांना प्रत्युत्तर; एका फोनवर मी...

पक्षांतर्गत गटबाजीमुळे शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना चुकीचा अहवाल दिल्याने लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे नाराज होत पक्षातील शहर पदाधिकाऱ्यांवर गटबाजीचा आरोप करत वसंत मोरे हे पक्षातून बाहेर पडले. त्यांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर मोरे हे अद्याप कोणत्याही पक्षात गेलेले नाहीत. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी सोडलेली नाही. पुणेकरांशी बोलून त्यांची इच्छा असेल तर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार, असेदेखील त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत मोरे यांनी त्यांच्याशी चर्चादेखील केली होती. त्यामुळे मोरे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात होते. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचीदेखील मोरे यांनी भेट घेत लोकसभेच्या उमेदवाराचा अंदाज घेतला होता. महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी आता आमदार धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने मोरे यांच्या फेसबुक पोस्टमुळे आता सस्पेन्स वाढला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वसंत मोरे नक्की कोणती भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Vasant More
Sanjay Rathod News : संजय राठोड यांचे भावना गवळी यांच्याबद्दल मोठे भाकीत !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com