Amol Kolhe News : ओवेसींना केलेला विरोध अमोल कोल्हेंना भोवणार? नेमकं प्रकरण काय

Shirur Lok Sabha Election 2024 : अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभेबरोबर न्यायालयीन लढाई लढावी लागण्याची शक्यता आहे.
Asaduddin Owaisi amol kolhe
Asaduddin Owaisi amol kolhe sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरूर लोकसभा मतदारसंघातील ( Shirur Lok Sabha Constituency ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्याची नोंद प्रतिज्ञापत्रात केली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे ( Vanchit Bahujan Aghadi ) उमेदवार अफताब अनवर शेख यांनी केली. याबाबत कारवाई न झाल्यास थेट उच्च न्यायालयात ( High Court ) याचिका दाखल करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यावरून राजकारण तापले असून, आता याबाबत अमोल कोल्हे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू असताना, विरोधी उमेदवारांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. डॉ. कोल्हे यांनी 2016 मध्ये आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती शपथपत्रात दिली नाही, असा आक्षेप घेण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकल्यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी वैध ठरवला. अर्ज वैध ठरल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. डॉ. कोल्हे म्हणाले, "विरोधकांच्या छातीत धडकी भरली, म्हणून रडीचे डाव खेळायला सुरुवात झाली आहे. बालिशपणाचं राजकारण करतायेत. पण हे करूनही उपयोग नाही म्हटल्यावर रडीचा डाव खेळायचं कमी होईना. विरोधकांना एकच सांगतो, सामना दिलेरीने खेळायचा असतो, भ्याडासारखा खेळायचा नसतो."

"एवढी पराभवाची भीती कशाला बाळगता. कारवाईच्या भीतीने जे भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत ते असले रडीचे डाव खेळत आहेत," अशी टीका कोल्हेंनी केली.

Asaduddin Owaisi amol kolhe
Amol Kolhe News : शिवाजीराव आढळराव पाटील डमी उमेदवार; अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

2016 ला ओवेसींच्या सभेला केला होता विरोध

डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१६ ला पुण्यात होणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या सभेला विरोध केला होता. धार्मिक तेढ वाढू नये, म्हणून विरोध केलेला. त्यामुळे कोल्हेंवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, यासंदर्भात डॉ. कोल्हे यांना कोणतीही कल्पना नव्हती. तसेच, पोलिसांकडून कोणतीही नोटीस देण्यात आलेली नव्हती. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नव्हती. हीच बाब डॉ. कोल्हे यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर स्पष्ट केली.

( Edited By : Akshay Sabale )

R

Asaduddin Owaisi amol kolhe
Amol Kolhe : 'आता दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा..!' अमोल कोल्हेंची डरकाळी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com