Thane Namo Maharojgar Melava : भाईंपुढे अजितदादांचे काही जमेना; ठाण्यातील दौरा रद्द

Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यातील नमो मेळाव्याला येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयार केली होती.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाण्यातील चेकनाका येथे नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयार केली होती. मात्र, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अजितदादांचा ठाणे दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे ठाण्याच्या भाईंपुढे पुण्याच्या दादांचे काही जमेना अशीच चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

'नमो महारोजगार मेळावा' ठाण्यातील मॉडेल मिल कंपाउंड येथे आज बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होता.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बॅनरबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयार सुरू केली होती. बॅनर लावल्यानंतर अचानक दुपारच्या सुमारास अजितदादांचा दौरा हा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्याचे पक्षाच्या वतीने आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Eknath Shinde
Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

मात्र, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी अजितदादांचा ठाणे दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे ठाण्याच्या भाईंपुढे पुण्याचे दादांचे काही जमेना अशीच चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे, तर राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनाची मिळालेली संधीही हुकल्याचे दिसत आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com