Loksabha Election 2024 : पुणे लोकसभेसाठी मोहोळ, मुळीकांचा रामनामाचा जप

Politcal News : अध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी यांचा सत्संग कार्यक्रम
Murlidhar mohol, jagdish mulik, sunil deodhar
Murlidhar mohol, jagdish mulik, sunil deodharsarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच इच्छुकांनी जोरात सुरू केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये भाजपमधील इच्छुकांनी आघाडी घेतली आहे. त्यासाठी भाजपच्या इच्छुकांकडून अध्यात्मिक कार्यक्रमावर भर दिला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी भाजपच्या इच्छुकांमधील स्पर्धा अधिकच तीव्र होत आहे. पक्षाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उमेदवाराच्या सर्वेक्षणात आपले नाव चर्चेत राहावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांबरोबरच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या लक्षात कसे राहता येईल, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.

Murlidhar mohol, jagdish mulik, sunil deodhar
Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये आघाडी भक्कम; चंपई सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहराचे माजी महापौर आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर, तसेच फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर हे इच्छूक आहेत. यामध्ये मोहोळ आणि मुळीक यांची नावे जोरदार चर्चेत असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांस सुरुवात केली आहे.

एका इच्छुकाने कार्यक्रम घेतला की त्यानंतर लगेचच दुसरा इच्छुक त्याच पद्धतीचा कार्यक्रम घेत आहे. यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यक्रम आयोजनाची जणू स्पर्धाच लागली की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडत आहे. मॅरेथॉन महाआरोग्य शिबिर सत्संग अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा या इच्छुकांकडून केला जात आहे.

गेल्या महिन्यात मुरलीधर मोहोळ यांनी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापने निमित्त ' अपने अपने राम ' हा कार्यक्रम घेतला होता. प्रसिद्ध वक्ते डॉ. कुमार विश्वास यांचा हा कार्यक्रम होता. स. प . महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच धर्तीवर आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी देखील पुणेकरांसाठी ' राम कथा ' सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची स्वप्नपूर्ती साकार झाल्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. विश्व विख्यात अध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी या यामध्ये श्री राम कथा सांगणार आहेत.

येत्या शनिवारी 10 फेब्रुवारीला संगमवाडी येथे जगदीश मुळीक फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे. जया किशोरी यांचा हा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम असल्याचा दावा केला जात आहे.

यापूर्वी देखील जगदीश मुळीक फाउंडेशनने बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा यांच्या ' हनुमान कथा' सत्संगाचे आयोजन केले होते. तीन दिवस हा कार्यक्रम चालला होता. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि इतर मंत्र्यांनी हजेरी लावली होती.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्याने आता अधिकाधिक आपल्याला चर्चा कसे आहे यासाठी इच्छुकांकडून हा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत इच्छुक उमेदवारांमधील ही स्पर्धा अशीच सुरू राहिल, असे भाजपचा एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

Murlidhar mohol, jagdish mulik, sunil deodhar
Jagdish Mulik : मुळीकांच्या 'व्हिजन पुणे'कडे भाजप पदाधिकाऱ्यांनीच फिरवली पाठ !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com