Loksabha Election 2024 : आता धंगेकर घरी बसणार; फडणवीसांची पाठराखण करताना मुळीकांकडून धंगेकरांचा समाचार

Jagdish Mulik Vs Ravindra Dhangekar : देवेंद्र फडणवीसांना आव्हान देणाऱ्या रवींद्र धंगेकरांना जगदीश मुळीक यांचं जोरदार प्रत्युत्तर
Jagdish Mulik, Devendra Fadnavis, Ravindra Fadnavis
Jagdish Mulik, Devendra Fadnavis, Ravindra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News :

पुणे लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्यापेक्षा कोणीही मोठा आला तरीदेखील आपणच निवडणूक जिंकणार, असं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर भाजपचे जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करत धंगेकरांवर पलटवार केला आहे.

रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे अपघाताने कसब्याचे आमदार झाले आहेत. 2009 आणि 2014 मध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता ते लोकसभेचे स्वप्न पाहत आहेत. परंतु लोकसभा तर सोडाच ते पुन्हा कसबा विधानसभेची (Kasba Assembly Constituency) निवडणूकदेखील जिंकू शकणार नाहीत, असा टोला मुळीक यांनी लगावला आहे.

Jagdish Mulik, Devendra Fadnavis, Ravindra Fadnavis
Loksabha Election 2024 : फडणवीस नायतर वरचा कोणीही येऊ दे, मी घाबरत नाय! काँग्रेसच्या 'या' नेत्यानं थेट फडणवीसांना दिलं आव्हान

रवींद्र धंगेकर हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी स्वत:ची तुलना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत करत आहेत, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं पुणेकर त्यांना माफ करणार नाहीत, असा इशारा जगदीश मुळीक यांनी दिला आहे.

रवींद्र धंगेकर यांच्याबाबत कसबा निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये असलेला भ्रम आता दूर झाला आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आल्याने कसब्यातील रहिवाशांचा भ्रमनिरास झाला आहे. धंगेकर लोकांची फक्त दिशाभूल करत असून, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी पारदर्शक कारभार करून दाखवला आहे.

फडणवीसांनी सर्व स्तरातील लोकांसाठी काम करून महाराष्ट्राला पुढे नेलं आहे, असा दावाही मुळीकांनी केला. फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढतील अथवा नाही हा भाग वेगळा, मात्र फडणवीसांनी ठरवलं तर महाराष्ट्रातील 48 पैकी कुठल्याही जागेवरून ते निवडणूक जिंकू शकतात. एवढं त्यांचं कर्तृत्व असल्याचा, विश्वास जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर प्रसिद्धीच्या हव्यासावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांसारख्या नेत्यांवर टीका करत आहेत. पण आता त्यांचा विधानसभा निवडणुकीतदेखील पराभव निश्चित आहे. त्यांनी कोणतीही निवडणूक त्यांनी लढवली तरी जनता त्यांना घरी बसवेल, असा आम्हाला विश्वास असल्याचं जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले.

(Edited by Avinash Chandane)

R

Jagdish Mulik, Devendra Fadnavis, Ravindra Fadnavis
Sharad Pawar News : महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार विजयाचा कोणता 'गुरूमंत्र' देणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com