Loksabha Election 2024 : आता महसूल अधिकाऱ्यांच्या 'होलसेल' बदल्या; लोकसभा निवडणुकीची चाहूल

Revenue Officers Transfered : उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या, प्रतिनियुक्तीवरील सेवा संपण्यापूर्वीच बदल्या झाल्याने नाराजी?
Dy Collector, Tehasildar
Dy Collector, TehasildarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Political News :

लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी निवडणुकीचे स्पष्ट संकेत येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या होलसेल बदल्या केल्यानंतर काल पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होईल, याची चाहूल आता लागली आहे. त्याचवेळी एका वादाचीही ठिणगी पडली आहे.

निवडणुकीत मुख्य भूमिका असते ती जिल्हाधिकारी (Collector) आणि त्यांची महसूल विभागाची (Revenue Department) टीम. सरकारने काल (16 फेब्रुवारी) महसूल विभागातील राज्यातील 41 उपजिल्हाधिकारी आणि 36 तहसीलदार अशा 77 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Dy Collector, Tehasildar
Sharad Pawar : 'राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाचा निर्णय सेटलमेंट करून...'; शरद पवारांचा गंभीर आरोप

विशेष म्हणजे काही काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलीविरोधात काही पोलिस अधिकारी मॅटमध्ये (राज्य प्रशासकीय लवाद) गेले आहेत.

त्यामुळे बदलीने नाराज झालेले महसूलचे काही अधिकारीही तीच वाट चोखाळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

अनेक महसूल अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यातील काहींची दूर बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमधून बदली झालेल्या दोन उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांपैकी उपायुक्त विठ्ठल जोशी यांची नक्षलग्रस्त अहेरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) म्हणून म्हणजे गडचिरोलीत, तर अविनाश शिंदे (सहायक आयुक्त, निवडणूक विभाग) यांची लातूरला उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे महापालिकेतील उपायुक्त सचिन इथापे यांना पंढरपूरचे प्रांताधिकारी, तर अजित देशमुख यांची मुंबई शहर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून बदली केली आहे. 41 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या (Dy Collector) जोडीने 36 तहसीलदारांच्याही (Tehsildar) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेकजण नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

आयोगाच्या आदेशानुसार घाईघाईने या बदल्या करण्यात आल्याचे समजते. कारण त्यामुळेच त्यातील अनेकांना पोस्टिंग म्हणजे नियुक्तीचे ठिकाण हे बदलीनंतर देण्यातच आलेले नाही. ते नंतर दिले जाईल, असे या बदलीच्या आदेशात नमूद केले आहे, तर बदली झालेल्यांनी तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना बदली झालेल्या ठिकाणाहून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. म्हणजे तेथे दुसरा अधिकारी येण्य़ाचीही वाट पाहण्यात आलेली नाही.

या प्रकारामुळे बदली झालेले अनेक अधिकारी नाराज असून, ते पोलिस अधिकाऱ्यांप्रमाणे बदलीविरोधात आवाज उठवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. त्याचवेळी प्रशासन स्तरावर लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजायला सुरुवात झाल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याची चर्चा आता होत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Dy Collector, Tehasildar
Maharashtra Politics : नीलेश राणे-भास्कर जाधव भिडले; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com