NCP Political News: 'राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्हाचा निर्णय सेटलमेंट करून देण्यात आला आहे', असा गंभीर आरोप खासदार शरद पवार यांनी केला आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या पदाला असलेली प्रतिष्ठा ठेवली नाही, असा हल्लाबोलही शरद पवारांनी केला.
अजित पवार गटच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी दिला. तर त्याआधी निवडणूक आयोगानेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय दिला. यानंतर शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींवर आता शरद पवारांनी भाष्य केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय हा शिवसेनेच्या निर्णयाची पुनरावृत्ती झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, हे देशाला माहिती आहे. पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. आगामी निवडणुकीपूर्वी यावर निर्णय घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे करणार आहोत," असं पवार म्हणाले.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सेटलमेंट करून देण्यात आलं. असा निर्णय येईल याची खात्री होती. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेबाबतही अशा प्रकारचा निर्णय दिला," असंही शरद पवार म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला.
अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन करत निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, पण जनतेनं उत्तर द्यावं, असं म्हटलं होतं. यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामतीचा मतदार समजदार आहे, त्यामुळे मतदार योग्य तो निर्णय घेतील, असं पवार म्हणाले.
अजित पवार हे मी एकटा आहे, असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना लोकशाहीमध्ये कोणी कुठेही उभं राहू शकतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
Edited By-Ganesh Thombare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.