Loksabha Election 2024 : आम्ही ठरवलयं; चंद्रकांत पाटील म्हणाले, '...तर बारामतीत रोजच'

Baramati Constituency : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांच्यात होणारी लढत राज्यासह देशात लक्षवेधी ठरणार आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महत्वाच्या जागांवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातीलच एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ होय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांच्यात होणारी लढत राज्यासह देशात लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर बारामतीत रोजच येऊन बसणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असे आम्ही ठरवलयं, असेही ते म्हणाले आहेत.

बारामतीत रविवारी (ता. 17) मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तिन्ही घटक पक्षांनी एकदिलाने व सांघिकपणे काम करावे, असे आवाहन केले. यावेळी राहुल कुल, वासुदेव काळे, संदीप खर्डेकर, प्रदीप गारटकर, रुपाली चाकणकर, सुरेश घुले, बाळासाहेब गावडे, नवनाथ पडळकर, जालिंदर कामठे, पृथ्वीराज जाचक, वैशाली नागवडे, सुरेंद्र जेवरे, पांडुरंग कचरे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

Chandrakant Patil
Devendra Fadnavis News : "पुन्हा यायला अडीच वर्षे लागली, पण दोन पक्ष फोडून आलो", फडणवीसांचं विधान

लोकसभेच्या निवडणुकीत (Loksabha Election) बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी करायचं आम्ही ठरवलं आहे. यासाठी गरज पडली तर रोजच बारामतीला येऊन बूथस्तरावर स्वताः बसून काम करीन, अशी तयारी चंद्रकांत पाटील यांनी दाखविली आहे. तर ज्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे काम करायचे आहे, त्यांनी पक्ष सोडून मगच ते काम करा, त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

रात्रीच्या अंधारात विरोधकांचे काम करायचे व दिवसा आमच्याबरोबर राहायचे, आमचे सरकार आल्यानंतर योजनांचा फायदा घेण्यासाठी आमच्याकडे यायचे असे अजिबात चालणार नाही, बांधिलकी आणि सांघिक भावना महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बुथवर किमान 370 मते महायुतीच्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत, असा संदेश दिला आहे, या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपासूनच प्रयत्न सुरु करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

बदला घेण्याची संधी आली...

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. तर त्यांनी केलेल्या अपमान व फसवणुकीचा परतफेड करणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना शब्द देऊन ऐन वेळेस माघार घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला. त्याच अपमान आणि फसवणुकीचा बदला घेण्याची संधी आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. तर सर्वांनीच घड्याळ या चित्रासमोरील बटन दाबून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी बारामतीत महायुतीच्या उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.

Chandrakant Patil
Manoj Jarange News : चव्हाण अन् जरांगेंमध्ये मध्यरात्री खलबतं, ताफा दूर थांबवत पोहचले अंतरवालीत; काय झाली चर्चा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com