Pune News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटदेखील अॅक्शन मोडवर आला असून, पक्षातील पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका शरद पवारांनी लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) इंदापूर तालुकाध्यक्षपदी अॅड. तेजसिंह पाटील व कार्याध्यक्षपदी इंदापूरचे महारुद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्षात दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचा धडाका सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इंदापूर तालुक्यात अजित पवार गटाने तालुक्यातील पूर्वीच्या तालुकाध्यक्षांची फेरनियुक्ती केली. त्यामुळे शरद पवार गटाचा तालुकाध्यक्ष कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात दौरे केले होते. त्यानंतर बुधवारी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत अॅड. तेजसिंह पाटील यांची तालुकाध्यक्षपदी, तर कार्यध्यक्षपदी महारुद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
अॅड. तेजसिंह पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पाटील यांचे चिरंजीव आहेत, तर महारुद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या (शिंदे गट) या पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा संभाळली होती.
पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी या निवडीचे पत्र दिले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, राष्ट्रवादीच्या सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.