Pune News : संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात सत्ताधाऱ्यांनी त्यांचा माणूस प्लांट केला आहे. तो गेल्या चार पाच वर्षांपासून संभाजीराजेंसोबत आहे. मात्र, तो त्याने संभाजी राजेंना बदनाम करण्याच घाट घातला असून त्यांना लोकांमधून उठवण्यासाठी, त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी दलाली करून बदनामी केली आहे, असा आरोप स्वराज्य पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष माधव तळेकर यांनी आपल्याच पक्षातील सरचिटणीस असलेल्या धनंजय जाधव यांच्यावर केला आहे.
धनंजय जाधव यांची पक्षातून हकलपट्टीची मागणी देखील तळेकर यांनी केली आहेसंभाजी राजें सोबत काम करणाऱ्या आमच्यासारख्या हजारो मावळ्यांचं नुकसान धनंजय जाधव यांनी केलं आहे, असे तळेकर म्हणाले.
पुढे बोलताना तळेकर म्हणाले, 'धनंजय जाधव यांनी छत्रपती संभाजी राजे आणि पक्षाच्या नावाने पैसा गोळा केला आहे. विधानसभा निवडणुकी वेळी तिकीट वाटपासाठी देखील त्यांनी गैरव्यवहार केला असून त्यातून प्रचंड मोठी संपत्ती जाधव यांनी गोळी केली आहे. त्याच्याकडे राहायला घर नव्हतं, गाडीमध्ये टाकायला डिझेलसाठी पैसे नव्हते आणि जाधव सांगतात त्यानुसार ते चौकामध्ये ते गॉगल विकायची मात्र सद्यस्थितीला त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंग, कोट्यावधींचे प्लॉट त्यांच्यावर नावावर असल्याचा आता समोर आलं आहे.'
स्वराज्य पक्षाला मोठं करण्याच्या ऐवजी भाजपला सपोर्ट करण्याचे काम आणि संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाला भाजपची बी टीम ठरवण्याचं काम आपल्या कृतीतून हे धनंजय जाधव करत आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांनी पाच हजार किलो चिकनच वाटप केलं तसंच भाज्यांच्या हजार गड्या त्यांनी वाटल्या, दहीहंडीचा कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केला यासाठी कोट्यावधींचा खर्च त्यांनी केला आहे. त्यांची ही तत्परता परिवारातील एका व्यक्तीला नगरसेवक करण्यासाठी आहे. त्यांनी ही तत्परता कधी पक्ष वाढीसाठी त्यांनी दाखवली नाही.ती दाखवली असती तर दहा-बारा आमदार आणि एका दोन खासदार पक्षाचे झाले असते, असे देखील तळेकर म्हणाले.
ते पक्षाचे सरचिटणीस आणि पुण्यामध्ये राहत असताना देखील त्या जिल्ह्यासाठी तालुकासाठी अध्यक्ष देखील त्यांनी नेमलेले नाही. तसेच सध्या त्यांच्या बॅनरवर संभाजी राजे यांचा त्याच्या ऐवजी ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो वापरत आहेत. त्यांनी अद्याप स्वराज्य पक्षाचा राजीनामा दिला नाही आणि भाजपमध्ये प्रवेश देखील केला नाही तरी देखील अशा प्रकारचं कृत्य करून जाणीवपूर्वक पक्षाची आणि संभाजी राजेंची बदनामी करण्याचं काम धनंजय जाधव करत आहेत. त्यामुळे हे मोठं षडयंत्र सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला असून धनंजय जाधव यांची हकलपट्टी करावी अशी आमची मागणी असल्याचं तळेकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.