Mahayuti Alliance : बुलढाण्यात महायुती फूटली, शिंदेच्या आमदाराची 'ती' ऑफर भाजपने धुडकावली

Sanjay Gaikwad News : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगीला सुरुवात झाली आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला लागले आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : नगरपालिका आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यापर्यंत सर्वच निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगीला सुरुवात झाली आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीचे महापौरपद शिवसेनेला द्यावे त्या बदल्यात बुलढाणा तुम्ही घ्या अशी ऑफर भाजपला दिली आहे. विशेष म्हणजे चिखलीत पालिकेत भाजपचा महापौर होता. त्यामुळे ही ऑफर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी धुडकावून लावली आहे.

Sanjay Gaikwad
PAN Aadhaar link : 'या' तारखेपूर्वी PAN-Aadhaar लिंक करा, नाहीतर तुमचे PAN कार्ड 'बंद' होईल?

आमदार गायकवाड यांनी बुलडाणा जिल्ह्यात कोणाची मक्तेदारी खपवून घेतली जाणार, महायुती करायची असेल तर सारख्या जागा सोडाव्या लागतील, तुम्ही म्हणाल तसे चालणार नाही. सर्वकाही सन्मानजनक झाले पाहिजे असे सांगून भाजपच्या नेत्यांना सुनावले. संजय गायकवाड यांचा स्वभाव बघता येथे महायुती होण्याची शक्यता दिसत नाही. सोबतच गायवाड यांनी भाजपने चिखलीवरचा दावा सोडला तर बुलडाणा महापलिकेचे महापौरपद तुम्हाला देऊन अशीही ऑफर ठेवली आहे.

मात्र, बुलढाण्यात 25 वर्षांपासून भाजप आणि शिवसेनाचा महापौर झाला नाही. त्यामुळे येथे कोणाचा दावा सध्या नाही. निवडणुकीच्या निकालानंतर ज्यांचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांचा महापौर होईल. बुलडाण्याची ऑफर देण्याचा अधिकार आमदार गायकवाड यांना अधिकार कोणी दिला असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केला.

Sanjay Gaikwad
8th Pay Commission : 'परफॉर्मन्स बेस्ड' फॉर्म्युला लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी उलथापालथ!

‘सिटिंग-गेटिंग' हा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. चिखली पालिकेत भाजपचा महापौर होता. त्यामुळे चिखली मागण्याचा अधिकारच शिवसेनेला नाही. ही जागा भाजपच लढणार आहे. बुलडाणा कोणाला सोडायचे यावर चर्चा होऊ शकते. येथे दोघांचाही महापौर नव्हता असेही शिंदे म्हणाले.

आम्ही महायुतीत लढण्यास तयार आहोत. मात्र शिंदे सेनेचे आमदार अवाजवी मागणी करीत आहे. आधीपासूनच दावे करीत आहे. त्यामुळे महायुतीत अडचण असल्याचे विजयराज शिंदे म्हणाले. गायकवाड दबंग आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आमदार निवासातील एका कर्मचाऱ्याला झोडपले होते. मध्यंतरी एका कंत्राटदारांची महागडी कार त्यांच्याकडे होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com