Pune News : पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ या विजयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांना तेराव्या फेरी अखेर 41 हजार 516 मतांचं लीड मिळालं आहे. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. वीसपैकी सतराव्या फेरीअखेर माधुरी मिसाळांना तब्बल 52 हजार 225 मतांनी आघाडीवर आहे.
2019 च्या निवडणुकांमध्ये माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांचे विजयाचे मार्जिन 36 हजार 767 इतकं होतं. आणि आता तेराव्या फेरी अखेरच त्यांनी 41000 लीड घेतल्याने गेल्या निवडणुकीपेक्षा त्या मोठा विजय साकार करतील असं सध्याच्या चित्रावरून दिसत आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना भाजपने उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडी कडून दुसऱ्यांदा अश्विनी कदम यांना पर्वतीच्या निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं.
पर्वती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला येईल आणि आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा लावून बसलेल्या आबा बागुल यांच्या हातात निराशा लागल्याने त्यांनी देखील अपक्ष म्हणून या विधानसभा मतदारसंघातून दंड थोपाटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पर्वती मध्ये सामना तिरंगी झाला.
गेल्या तीन टर्म पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ या चांगल्या मताधिक्याने विजयी होत आल्या आहेत. असं असताना देखील यंदा त्यांना तिकीटासाठी काहीसा संघर्ष करावा लागला. भाजपमधील माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी यंदा कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढायची असा चंग बांधला होता.
भाजपने पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी नाकारल्यानंतर देखील श्रीनाथ भिमाले हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या घरी जाऊन समजूत काढल्यानंतर भिमाले यांची नाराजी दूर झाली.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या आबा बागुल यांची मनधरणी करण्यासाठी फक्त स्थानिक पातळीवर प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं. वरिष्ठ पातळीवरून जास्त प्रमाणात प्रयत्न न झाल्याने आबा बागुल हे निवडणूक रिंगणात कायम राहिले. त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी महाविकास आघाडीसाठी कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.
14व्या फेरीनंतर माधुरी मिसाळ यांना 86, 433 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात च्या उमेदवार अश्विनी कदम यांना 40515 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी आठ हजार सहाशे मतं घेतली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.