Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

PMC Election : राजकारणात उलटफेर होणार! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर दोन दिवसांत शिक्कामोर्तब?

Sharad Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शशिकांत शिंदे यांनी देखील पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
Published on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी रात्री आघाडीबाबत बैठक पार पडली. त्यानंतर आता अजित पवार हे पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेणार असल्याचं समोर आला आहे. या बैठकांनंतर अंतिम निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पक्ष कार्यालयात ही बैठक संपन्न होणार असून या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेबरोबरच उमेदवारांच्या नावांची देखील निश्चिती केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या शशिकांत शिंदे यांनी देखील पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये नेमके किती नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यासाठी सकारात्मक आहेत आणि किती नेते प्रतिकूल आहेत. याबाबत शशिकांत शिंदे सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar
Nitin Gadkari policy : तुमची बदनामी होतेय..! संसदेत दिग्विजय सिंह यांचं ऐकून घेत समोर बसलेल्या गडकरींनी दिले मोठ्या निर्णयाचे संकेत

विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एकत्रित निवडणूक लढविण्यास कडाडून विरोध केला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील शहराध्यक्षांनी आघाडी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, अजित पवार गटासोबत जाण्याबाबत खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीही सकारात्मक मत व्यक्त केले आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Atal Bihari Vajpayee : वाजपेयींनी ‘तो’ प्रस्ताव फेटाळला, अन्यथा अडवाणी झाले असते पंतप्रधान; भाजपमधील धक्कादायक माहिती समोर

मंगळवारी रात्री पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर असून त्या दरम्यान ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी समवेत जाण्याबाबत मते जाणून घेणार आहे.

एकूणच दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत महत्त्वाची पावले टाकली जात असून, पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होईल, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com