Assembly Election 2024 : जयंत पाटलांकडून प्रशांत जगतापांना उमेदवारीचे संकेत; चेतन तुपेंची डोकेदुखी वाढणार

Jayant Patil : पुण्यातील विजय निश्चित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Chetan tupe, Prashant Jagtap
Chetan tupe, Prashant JagtapSarkarnama
Published on
Updated on

Pune : महाराष्ट्रातील सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीची मेहनत घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र विधानसभेची पहिली उमेदवारी जाहीर करत प्रंचड मोठी आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीला आठ-नऊ महिन्यांचा कालावधी असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार चेतन तुपेंची डोकेदुखी वाढणार आहे. (Assembly Election 2024)

हडपसर (Hadpsar) विजय निश्चित मेळाव्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र, पक्षाची पडझड होत असताना प्रशांत जगताप ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहिले आहेत.

Chetan tupe, Prashant Jagtap
Pune Police News : पोलिस आयुक्तांच्या 'परेड'नंतर काही तासांतच नीलेश घायवळने दाखवला ‘दम’!

फूट पडण्याआधी जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. फूटीनंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्षपदी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. आज हडपसर मतदारसंघात विजय निश्चित मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी त्याला उल्लेख करत कामाची पावती देऊन टाकली. तसेच विधानसभेच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केले. त्यामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे विरूध्द प्रशांत जगताप हे सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाटील म्हणाले, प्रशांत जगताप पक्षाची भूमिका हिरिरीने मांडत आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे असंख्य कार्य़कर्ते धीराने काम करत आहेत. पक्ष एकत्रित असताना त्यांना शहराध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी शहरात खूप काम केले. हडपसर मतदारसंघाची काळजीही ते करत असतात. आज ते शहराची संघटना सांभाळत आहेत, असे सांगत पाटील यांनी जगतापांना उमेदवारीचे संकेत दिले.

चेतन तुपेंना इशारा

या मतदारसंघात चेतन तुपे दोन हजार 300 मताधिक्याने विजयी झाले. त्यात तुम्हा सगळ्यांचा मोठा हात आहे. या मतदारसंघातील पक्ष संघटित ठेवणे त्यांनी अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. खूप कमी मार्जिन होतं. आपल्याला भाजपची मते मिळून निवडून येऊ असे कुणी स्वप्न पाहत असेल तर त्यांनी अजून भाजपला तुम्ही ओळखले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे. लोकं आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शंभर टक्के यशस्वी होऊ, असे पाटील यांनी सांगितले.

Chetan tupe, Prashant Jagtap
Vasant More Status : शर्मिला ठाकरेंचे ‘ते’ विधान अन्‌ वसंत मोरे म्हणतात ‘पुणे की पसंत...मोरे वसंत’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com