Vasant More Status : शर्मिला ठाकरेंचे ‘ते’ विधान अन्‌ वसंत मोरे म्हणतात ‘पुणे की पसंत...मोरे वसंत’

Pune Loksabha Election : मनसेत एकटे पडलेले वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिले सडेतोड उत्तर
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला नामोहरम करण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असताना पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र अंतर्गत वादातच अडकलेली दिसत आहे. हा संघर्ष आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येऊ लागला आहे. (Vasant More, who is Alone in MNS, gave bitter reply to his opponents within party)

गेल्या काही काळापासून मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी एका बाजूला आणि वसंत मोरे एका बाजूला असं चित्र पुण्याच्या राजकारणात दिसून येत आहे. मनसेमध्ये दोन गट असल्याचे आता लपून राहिलेले नाही. मात्र, अलीकडच्या काळामध्ये वसंत मोरे यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्तीही त्यांच्या विरोधात दंड थोपटू लागले आहेत, त्यामुळे मोरे आपल्या मनातील खदखद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More
Vishwajeet Kadam Effort : विश्वजित कदमांनी करून दाखवलं; 19 कोटींचा निधी मंजूर करून आणला...

आगामी निवडणुकीमध्ये मनसेकडून लोकसभेचा उमेदवार कोण असणार, या चर्चांमधून हा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पण, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "साईनाथ बाबर दिल्लीत गेले, तर दुधात साखर पडेल," असं वक्तव्य केले. त्यामुळे वसंत मोरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.

शर्मिला ठाकरे यांच्या विधानानंतर मोरेंनी बुधवारी व्हॉट्स अ‍ॅपवर एक सूचक स्टेटस ठेवत. "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच. पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," असा सूचक इशारा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी "सगळेच म्हणू लागलेत, पुणे की पसंत...मोरे वसंत" असं स्टेटस ठेवलं आहे.

Vasant More
Eknath Shinde : शिवसेनेच्या चुरगळलेल्या झेंड्यांचा अर्थ काय? मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अशीही 'झेंडे'बाजी

दरम्यान, राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेचे प्रभारी म्हणून अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे यांनी नुकतेच पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्याचा अहवाल राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे.

Vasant More
Pune Police News : पोलिस आयुक्तांच्या 'परेड'नंतर काही तासांतच नीलेश घायवळने दाखवला ‘दम’!

मोरे छातीठोकपणे आपण मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत असले तरी मनसेतील इतर कोणताही वरिष्ठ पदाधिकारी मोरे यांचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे इतर मुद्द्यांसह उमेदवारीच्या मुद्द्यावरून देखील मोरे मनसेमध्ये एकटे पडल्याची चर्चा सुरू आहेत. अशातच मोरे यांनी ‘सगळेच म्हणू लागलेत. पुणे की पसंत...मोरे वसंत’ असं स्टेटस ठेवून आपल्या अंतर्गत विरोधकांना उत्तर दिले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Vasant More
Baba Siddique Resigns : देवरांनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का; बाबा सिद्दीकींचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com