CM Bhajanlal Sharma : 'मविआ' म्हणजे ठगबंधन; राज्यस्थानचे CM शर्मांनी पुण्यात येताच काँग्रेसवर डागली तोफ

CM Bhajanlal Sharma Maharashtra MahaYuti Rajasthani Samaj Samamel Pune MVA Congress : राज्यस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात पुण्यातून सहभागी होताच, महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
CM Bhajanlal Sharma 1
CM Bhajanlal Sharma 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पुणे इथल्या राजस्थानी समाज संमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडी आणि काँग्रेसला त्यांनी 'ठगबंधन', असे म्हटले.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याशिवाय आणि खोटी आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही, हे लक्षात ठेवून महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या गतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहा, असे आवाहन केले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज मुंबई दिवसभर प्रचारसभा घेणार आहेत.

मुख्यमंत्री शर्मा यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना विश्वासघातशिवाय जनतेला त्यांच्याकडून काहीच मिळू शकत नाही, असे सांगितले. तसेच काँग्रेस (Congress) पक्ष निवडणूक आल्यावर फक्त अफवा पसरवतो. भ्रष्टाचारात पाया कसा रचावा, हे काँग्रेसला माहीत आहे, असा टोला देखील शर्मा यांनी लगावला.

CM Bhajanlal Sharma 1
Devendra Fadnavis On MVA: फडणवीसांनी भरसभेत ऐकवली 'ती' ऑडिओ क्लिप; 'मविआ'तील पक्षांवर केला गंभीर आरोप

मोदींवरचा विश्वास वाढला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना, मुख्यमंत्री शर्मा यांनी पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले, "मोदींच्या नेतृत्वाखाली भारत संपूर्ण जगात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे". गरीब कल्याणकारी योजना, सीमा सुरक्षा, दहशतवादाशी सामना आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या कामाचे उल्लेख शर्मा यांनी कौतुक केले.

CM Bhajanlal Sharma 1
Supriya Sule: ...तर अजितदादांना नोटीस पाठवणार ; सुप्रिया सुळे यांचा इशारा

राजस्थानी समाजाचे कौतुक

मुख्यमंत्री शर्मा यांनी राजस्थानी समाजाची भूमिका आणि त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी अभिमान असल्याचे सांगितले. प्रत्येक राजस्थानीला राष्ट्रवाद हा सर्वोच्च आहे. राष्ट्रासाठी हा समाज नेहमीच समर्पित असतो. महाराष्ट्र आणि राजस्थान दोन्ही स्वाभिमानाच्या भूमी आहेत. जिथे महाराणा प्रताप, महाराजा सुरजमल, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे महान योद्धे जन्माला आले, असे म्हटले.

काँग्रेस फक्त फसवणूक करू शकतो

काँग्रेसवर निशाणा साधताना मुख्यमंत्री शर्मा म्हणाले, "राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राजवटीत तरुणांची फक्त फसवणूक होत होती. गुंडाराजचे वर्चस्व होते. भाजप सरकार येताच त्यांनी पेपर लीक प्रकरणांच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. गुंड आणि माफियांचा नायनाट करण्यासाठी अँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना केली". डबल इंजिन सरकारने राजस्थानमधील जाहीरनाम्यातील 50 टक्के आश्वासने 11 महिन्यांत पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातही डबल इंजिन सरकार आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल आणि राज्यातील विकासाचा वेग वाढले, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com