Congress Political News : विधानसभेला नवा विरोधी पक्षनेता बुधवारी मिळणार; काँग्रेसच्या हायकमांडकडून 'या' नावावर शिक्कामोर्तब ?

Maharashtra Politics : ...त्यामुळे विधानसभेत विरोधी बाकावर कॉंग्रेसचे आमदार सर्वाधिक झाले आहेत.
Nana Patole- Balasaheb Thorat - Ashok Chavan
Nana Patole- Balasaheb Thorat - Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने ते पद सध्या रिक्त झालेले आहे. ते भरण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर त्यांचा गट राज्यातील सत्तेत सामील झाला. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाकावर कॉंग्रेसचे आमदार सर्वाधिक झाले आहेत. त्यातून त्यांचा विरोधी पक्षनेता होणार आहे. त्यासाठीच पटोले हे दिल्लीला गेले आहेत.

महाराष्ट विधानसभेच्या रिक्त विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड करायची यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी सकाळी दिल्लीला रवाना झाले. त्याची बातमी 'सरकारनामा'ने दुपारी देताना नवीन विरोधी पक्षनेत्याचे नाव बुधवारी जाहीर होईल असे म्हटले होते.तो अंदाज काही तासांत खरा ठरला. कारण पटोले यांनी महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता बुधवारी पाहाय़ला मिळेल असे सायंकाळी दिल्लीत सांगितले.

Nana Patole- Balasaheb Thorat - Ashok Chavan
Jalgaon Political News : जळगावात मंत्री महाजन,पाटलांची शिष्टाई फळाला; महापालिका आयुक्तांवरचा अविश्वास प्रस्ताव भाजप मागे घेणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार(Ajit Pawar) यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने ते पद सध्या रिक्त झालेले आहे. ते भरण्याच्या हालचाली आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर त्यांचा गट राज्यातील सत्तेत सामील झाला. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाकावर कॉंग्रेसचे आमदार सर्वाधिक झाले आहेत. त्यातून त्यांचा विरोधी पक्षनेता होणार आहे. त्यासाठीच पटोले हे दिल्लीला गेले आहेत.

आपल्या वरिष्ठांची भेट घेऊन विरोधी पक्षनेत्याच्या नावावर चर्चा ते करणार आहेत. पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांची त्यांनी सोमवारी भेट घेतली. त्यांच्याशी त्यांनी विरोधी पक्षनेता कोणाला करायचे आणि 'इंडिया' या भाजपविरोधात स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक महाराष्ट्रात घेण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता (Opposition Leader) बुधवारी मिळेल असे ते म्हणाले.

Nana Patole- Balasaheb Thorat - Ashok Chavan
Karad News : बावनकुळेंच्या वक्तव्यावर पृथ्वीराजबाबांचे 'नो कॉमेंट..' म्हणाले, मी अडचणीत आलो....

तसेच 'इंडिया'ची पुढील बैठक येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात होईल अशी माहितीही त्यांनी दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनाही ते भेटणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचा कोण आमदार होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

पटोलेंची पवारांवर पटोलेंची प्रथमच सावध प्रतिक्रिया...

एरवी शरद पवारांवर नथीतून तीर मारणाऱ्या पटोलेंनी यावेधी प्रथमच त्यांच्याविषयी सावध आणि संयमी भूमिका घेतल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या पुणे दौऱ्यात मोदी व पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याविषयी विचारले असता एरवी पवारांवर उसळून येणारी त्यांची प्रतिक्रिया यावेळी तशी आली नाही. पवारांच्या भूमिकेवर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही,असे ते म्हणाले.

Nana Patole- Balasaheb Thorat - Ashok Chavan
Abhimanyu Pawar News : कुणाच्या मेहेरबानीवर आमदार झालो नाही ; निलंगेकरांना मतदारसंघातच पवारांचे आव्हान..

तसेच तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असल्याने त्यांनी निर्णय घ्यायचा आहे,असे त्यांच्या स्वभावाला न पटणारे संयमी मतप्रदर्शन त्यांनी केले.या दिल्ली वारीत पुणे जिल्ह्यातील भोरचे पक्षाचे आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्याबरोबर होते. त्यांचेही नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे थोपटे हे विरोधी पक्षनेते होऊ शकते असे संकेत मिळाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com