Ajit Pawar : अजितदादांकडे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मागितली विधानपरिषदेची जागा !

Maharashtra Legislative Council Election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणी देखील पार पडेल. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपत आहे.
Ajit Pawar - Deepak Mankar
Ajit Pawar - Deepak MankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधिमंडळ सचिवालयातर्फे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना येत्या 2 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून 12 जुलैला ही निवडणूक घेतली जाणार आहे.

या निवडणुकीसाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या अकरा जागांपैकी महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळणार याबाबतही चर्चा सुरू असतानाच पुण्याला विधानपरिषदेची एक जागा द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मजमोजणी देखील पार पडेल.विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपत आहे. ही द्विवार्षिक निवडणूक असून दर दोन वर्षांनी यातील सदस्य बदलत जातात. दरम्यान या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी मतांचा कोटा कोणाला किती जागा जाणार हे ठरवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणाऱ्या जागेवर आता पासूनच लॅाबिंग सुरु असल्याचं चित्र आहे.

Ajit Pawar - Deepak Mankar
Assembly Election 2024 : 2019 मध्ये भोपळाही न फोडणारी मनसे पुणे जिल्हा काबीज करण्याच्या तयारीत

दरम्यान, पुण्यातील शिष्टमंडळाने नुकतीच मुंबईत (Mumbai) थेट अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विधानपरिषदेचे जागा पुण्याला द्यावी अशी लेखी मागणी केली आहे. ही जागा मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते फायदेशीर ठरेल असा युक्तिवाद पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केला असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ही जागा पुण्याला मिळाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ajit Pawar - Deepak Mankar
Chandrakant Patil Vs Ravindra Dhangekar : चंद्रकांतदादांनी ठेवलं धंगेकरांच्या दुखऱ्या नसेवर बोट; म्हणाले...

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, पुण्याला एक विधानपरिषदेची जागा द्यावी,अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. शहरातील कार्यकर्त्यांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं आहे. मात्र अजितदादा जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. दादा नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा आम्हाला असल्याचे देखील मानकर यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com