Supriya Sule : "साहेब आणि दादा एकत्र आल्यास..."; NCP युतीच्या चर्चांवर सुप्रियाताईंची मोठी प्रतिक्रिया

Supriya Sule On NCP Reunion : ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राज्यभरात सुरू असतानाच राष्ट्रवादीचे दोन्ही काका-पुतण्यांचे गट एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Apr : ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राज्यभरात सुरू असतानाच राष्ट्रवादीचे दोन्ही काका-पुतण्यांचे गट एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा साखरपुडा असो वा रयत शिक्षण संस्थेच्या बैठकांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांच्या सतत गाठीभेटी होताना दिसत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काका-पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले तर आपली काहीही हरकत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंप्रमाणे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Shivsena UBT MNS Alliance : राज-उद्धव युतीची चर्चा सातासमुद्रापार? दोन्ही बंधू एकाच वेळी परदेशात गेल्याने चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शरद पवार आणि अजित पवार हे जे काही निर्णय घेतील तो मान्य असेल. असंही कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितच आहोत. आमचे राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत."

तर यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत नेते एन.डी. पाटील यांचा दाखला दिला. त्या म्हणाल्या, "एन.डी. पाटील आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद होते. तरीही आमच्या नात्यांमध्ये कधी कटुता आली नाही.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Manali Ghanwat death : धनंजय मुंडेंचे खास असलेल्या राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या...

त्यामुळे आता जर अजितदादा सॉफ्ट होत असतील तर त्यात गैर काय?" असं म्हणत त्यांनी अजितदादांसोबत जाण्यात काही गैर नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, याचवेळी त्यांनी अजितदादांकडून आतापर्यंत एकत्रिकरणाचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही स्पष्ट केलं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com