NCP Pune: राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष कोण? दोघांमध्ये चुरस,अजितदादाचं धक्कातंत्र?

Who will be NCP Pune City President:शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत होती.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पोलिसांना खोटी कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेल्या दीपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

राष्ट्रवादीचे रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदासाठी चार ते पाच नेते इच्छुक असल्याचे पाहायला मिळालं, मात्र आता त्यातील काही नेत्यांनी माघार घेतली आहे. सध्या दोनच मोठे नेते शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असल्याचे दिसते.

पुढील काही दिवसांमध्ये शहराध्यक्ष पदाची बाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेस मधल्या असलेल्या नेत्यांना संधी मिळणार का? की अजित पवार सरप्राईज शहराध्यक्ष देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवीन शहराध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे. सुरुवातीला या रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदासाठी आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत होती.

आता आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतःला शहराध्यक्ष पदापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहेत. त्यांनी वरिष्ठांना कळविले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे आणि माजी सभागृह नेते सुभाष जगताप हे प्रबळ दावेदार राहिले आहेत.

Ajit Pawar
Nandurbar Politics: विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी; श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव कायम

येत्या काही दिवसात 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे . या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होत असताना शहराध्यक्ष असणं आवश्यक असल्याचं बोलणं जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये शहराध्यक्ष पदाचे नाव जाहीर होईल असं सांगितलं जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे . पुढील काही दिवसांमध्ये प्रभाग रचनेच्या कामाला देखील सुरुवात होईल अशांमध्ये महापालिकेचे उत्तम जाण असलेल्या नेत्याच्या हातामध्ये शहराध्यक्षपदाची धुरा देण्यात येईल असं बोललं जात आहे. त्यामुळे सुभाष जगताप आणि दत्ता धनकवडे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

असे असले तरी उपमुख्यमंत्री अजितदादा ऐनवेळी एखाद्या वेगळ्या नेत्याच्या गळ्यामध्ये शहराध्यक्ष पदाची माळ टाकू शकता अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार नेमकी कोणती खेळी करणार हे महत्वाचं ठरणार आहे .

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com