Nandurbar Politics: विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी; श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव कायम

Vijaykumar Gavit Vs Chandrakant Raghuwanshi: विजयकुमार गावित भ्रष्टाचाराच्या योजना राबवत असतात, गावित यांना मंत्री पदावरून का हाकलले यांचं उत्तर द्याव, असे चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे. नंदुरबारचा सातबारा गावित कुटुंबियांचा नावावर नाही, असे ते म्हणाले.
Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant RaghuwanshiSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News : भाजपचे माजी मंत्री व आमदार विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते जगजाहीर आहे. श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव कायम आहे.

नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा विजयकुमार गावित विरुद्ध चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वादाचा भडका उडाला आहे. भांडे वाटपाचा कार्यक्रमावरुन विजयकुमार गावित अन् चंद्रकांत रघुवंशी यांच्यात वाजलं आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप आमदार विजयकुमार गावित भ्रष्टाचाराच्या योजना राबवत असतात, डॉ. विजयकुमार गावित यांना मंत्री पदावरून का हाकलल यांचं उत्तर द्याव, असे चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं आहे. नंदुरबारचा सातबारा गावित कुटुंबियांचा नावावर नसल्याची टीका आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.

Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Ladki Bahin Yojana: अडीच हजार 'लाडक्या बहिणी' निघाल्या 'खोटारड्या'; 'देवाभाऊ'कारवाई करणार, सरकारी नोकरी तरीही हाव सुटेना!

मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांना भाड्यांच्या पेट्या का वितरण करण्यात येत नाही, असा सवाल जिल्हाप्रमुख रघुवंशी यांनी ठेकेदाराला केला. जोपर्यंत लोकप्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी संच वाटपाला येत नाहीत. तोपर्यंत लाभार्थ्यांना ते देता येणार नाही, असे ठेकेदाराने सांगितले. यावरुन ठेकेदार आणि राम रघुवंशी यांच्यात शाब्दीत वाद झाला.

Dr. Vijaykumar Gavit & Chandrakant Raghuwanshi
Chhagan Bhujbal: फडणवीसांच्या आग्रहापोटी भुजबळांची मंत्रिमंडळात एन्ट्री; महायुतीला मोठा ओबीसी नेता...

कार्यक्रमांच्या ठिकाणी विजयकुमार गावित यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्यात शाब्दिक वाद विकोपाला गेला.गावित यांनी थेट राम रघुवंशी यांना गेट आऊट म्हणत हा आमचा कार्यक्रम आहे मी आमदार आहे, तुम्ही येथून निघून जा, असा सल्ला दिला.

"चंद्रकांत रघुवंशी यांनी हे कोण कोणत्या गोष्टीचे लाभार्थी आहे, हे सर्व मी पुढे बोलणार आहे, असं ते म्हणाले. चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासीच्या जमिनी हडप करण्याचे काम करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com