
Pune News : भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील 58 शहर आणि जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी पक्षाने नवीन नेत्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवलेली असताना पुण्यात मात्र पुन्हा एकदा पक्षाने शहराध्यक्ष पदासाठी धीरज घाटे यांच्याच नावाला पसंती दिली आहे.
सध्या भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात अली आहे. आता शहर आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमी वरती ही नियुक्ती रखडली होती.
आता भाजपाने आज 58 शहर आणि जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून या पदांच्या नियुक्तीसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी चिंचवड ची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली होती. धनंजय महाडिक यांच्या निरीक्षणाखाली पुण्यामध्ये शहराध्यक्ष पदासाठी मतदान देखील झालं.
पुण्यातील तब्बल 45 ते 50 मतदानाचा अधिकार असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पसंतीची तीन नावे कळवली होती. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती बैठक घेऊन शहराध्यक्ष पदाची नावे फायनल करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले आणि सध्याचे अध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांचं नाव आघाडीवर होतं.
यंदा पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदामध्ये बदल होईल आणि नव्या चेहऱ्याला भाजप संधी देईल, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भाजपने धीरज घाटे यांच्यावरती शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी देखील घाटे यांनी आपल्याला कार्यकाल वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. आपल्या कार्य काळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. सध्या तरी पक्षाने त्यांची ही मागणी पूर्ण केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.