Maharashtra SIR: पुण्यात SIR मोहिमेत मतदार नोंदणीत टाळाटाळ! कोथरुडमधील सात शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra SIR: याप्रकरणी महापालिकेच्या पाच आणि एका खासगी शाळेतील दोन अशा सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 Election
Election Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra SIR: निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याचा आदेश धुडकावणे कर्वेनगर भागातील शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाच आणि एका खासगी शाळेतील दोन अशा सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Election
Annamalai Politics: तामिळनाडूच्या राजकारणात नव पर्व! अब्दुल कलाम आले केंद्रस्थानी; भाजपची साथ सोडल्यानंतर अण्णामलाईंची मोठी घोषणा

याबाबत कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी मोहिमेच्या पर्यवेक्षक मनीषा गुलाबराव मातेरे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 Election
Sattar Politics : विधान परिषदेतून माघार, जिल्हा बँकेत एंट्री! सत्तारांची नवी राजकीय खेळी; म्हणाले, 'सहज निवडून...'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल उदमले यांनी कर्वेनगर परिसरातील शाळांमधील या सात शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी लेखी आदेश दिले होते. मात्र, या शिक्षकांनी कामात कुचराई करत आदेशाचे पालन केले नाही. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com