TET Exam Date: TET पेपर फुटीला 3 महिने उलटले; परीक्षा कधी होणार? लाखो उमेदवार संभ्रमात

Maha TET 2026: पेपर फुटीनंतर टीईटी परीक्षा रद्द झाली. ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा याचा निर्णय अद्याप नाही; लाखो उमेदवार परीक्षेच्या तारखेच्या प्रतीक्षेत.
Maharashtra TET latest update news
Maharashtra TET latest update newsSarkarnama
Published on
Updated on
  1. पेपर फुटीनंतर टीईटी परीक्षा रद्द; तीन महिने उलटूनही नवी तारीख नाही.

  2. ऑनलाइन की ऑफलाइन? टीईटी परीक्षेच्या पद्धतीवर सरकारचा अंतिम निर्णय रखडला.

  3. लाखो उमेदवार संभ्रमात; टीईटी परीक्षा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष.

TET Paper Leak: शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर मोठा गदारोळ झाला. अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा केली.

मात्र परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप राज्य सरकारला घेता आला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षेच्या निर्णयासंदर्भातील भिजत घोंगडे अजूनही राज्य शासनाच्या दालनात पडून आहे. परंतु यामुळे टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जून 2026 मध्ये टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी टीईटी परीक्षेचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Maharashtra TET latest update news
Free School Bag Scheme: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर! सरकारची मोठी घोषणा, 165 कोटी मंजूर

पेपर फुटी मुळे राज्यभरात शिक्षक व परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पेपर फुटी प्रकरणे बिहार,उत्तर प्रदेश, हरियाणासह विविध ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

टीईटी पेपर फुटीचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची घोषणा केली. परंतु टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे सहज सोपे नाही.

Maharashtra TET latest update news
Gram Sevak: ग्रामसेवकांच्या मनमानीला लगाम! आता GPS सांगणार ‘साहेब’ कुठे आहेत? ग्रामविकास विभागाचा आदेश

या परीक्षेसाठी सुमारे सहा ते साडेसहा लाख उमेदवार अर्ज करतात. त्यातच एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला सुद्धा मोठा विरोध झाला. त्यामुळे शासन टीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी की ऑफलाइन पद्धतीने घ्यावे याबाबत चिंतन करत आहे. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवार टीईटी परीक्षा केव्हा घेतली जाणार याच्या प्रतीक्षेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com