Nana Patole : मराठा आरक्षणावर नाना पटोले काढणार तोडगा, कसा आणि कधी?

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी एक वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. यातच काँग्रेसच्या नेत्यांना मराठा आंदोलकांनी घेरलं आहे.
nana patole.jpg
nana patole.jpgsarkarnama
Published on
Updated on

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यातील काँग्रेस भवन येथे पार पडत आहे. या बैठकीदरम्यान मराठा आंदोलकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घातला. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे काँग्रेस भवन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.

काँग्रेसच्या ( Congress ) पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीच्या आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी बाबत आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. विश्वजीत कदम तसेच राज्यातील प्रमुख नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आहे.

याप्रसंगी मराठा आंदोलकांनी बैठक स्थळी येत आंदोलन करत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी पटोले ( Nana Patole ) यांनी आपण याबाबत सकारात्मक असल्याचे देखील सांगितलं.

nana patole.jpg
Maval Congress : मोठा राजकीय भूकंप? 'या' बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सोडली; अजित पवार गटाच्या वाटेवर...

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले, "2014 मध्ये भाजपने मराठा, धनगर आणि इतर समाजांना आरक्षण देण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात आणि देशात त्यांचा बहुमताचे सरकार असताना देखील त्यांनी आरक्षणाबाबत योग्य ती ठोस पावले उचलली नाहीत. त्यांनी या समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे समाजात उद्रेक निर्माण झाला आहे."

nana patole.jpg
Maval Congress : मोठा राजकीय भूकंप? 'या' बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सोडली; अजित पवार गटाच्या वाटेवर...

"राज्यातील सरकारने समाजात भांडणं लावण्याचा प्रकार घडवला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा समाज असे वातावरण उभं केलं आहे. यामध्ये सामान्य माणूस चिरडला जात आहे. काँग्रेसने विशेषत: राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यात भूमिका मांडली असून आरक्षणाची मर्यादा ही 50% पेक्षा जास्त करण्यात येणार आहे. त्यासह आरक्षणाबाबतच्या मागण्या पूर्ण करण्याचा मानस काँग्रेसचा आहे. मात्र, भाजप आरक्षण विरोधी आहे. महाराष्ट्रत बहुमतानं आघाडीचे सरकार जेव्हा येईल, तेव्हा मराठा आरक्षणावर तोडगा नक्की काढणार, हे आमचं वचन आहे," असं नाना पटोले यांनी सांगितलं.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com