Cabinet Meeting : महायुती सरकारचा मोठा निर्णय; वेल्हे तालुका आता 'राजगड' म्हणून ओळखला जाणार

Mahayuti Government Decision : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा ....
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता कधीही लागू शकते. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाकडून लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावण्यात आलेला आहे. आजदेखील मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला आहे. वेल्हा तालुक्याचे नामांतर करून आता राजगड असे करण्यात आलेले आहे. तसेच अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आला.

Eknath Shinde
Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांच्या शिलेदाराने सांगितले, रोहितदादांना घेरणारच...

वेल्हे (Velhe Taluka) तालुक्याचे नाव राजगड करावे, याबाबतची मागणी सातत्याने परिसरातील गावातील नागरिक करत होते. या नागरिकांच्या मागणीची दखल घेत त्याबाबतचे प्रस्तावदेखील ग्रामपंचायतीकडून मागवण्यात आले होते.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव करून पाठवले होते. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस राज्य सरकारला करून मंजूर करून घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मध्ये त्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.

या निर्णयाने अहमदनगर शहरवासीयांची, जिल्हावासीयांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे, असे मत अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Eknath Shinde
Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : प्रचार कार्यालयाचा स्तंभ उभारला, ठाकरे सेना विजयाची गुढी उभारणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com