Ahmednagar News : तलाठ्याचे फर्मान, डान्सबारमध्ये घेऊन चल...

Devendra Fadnavis : भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या अख्यारीत असलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्यारीत असलेल्या गृह विभागाकडे झाल्याने चर्चेला उधाण
female Talathi red-handed accepting bribes
female Talathi red-handed accepting bribesSarkarnama
Published on
Updated on

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "वाळू तस्करी करायची असेल तर, मुंबईला डान्सबारमध्ये घेऊन चल" असे फर्मान एका तलाठ्याने काढले असून, याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सागर कोकणे याने ही तक्रार दिली आहे.

भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या अख्यारीत असलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्यारीत असलेल्या गृह विभागाकडे म्हणजेच, पोलिसांकडे झाल्याने यावर काय कारवाई होते, याची चर्चा संगमनेरमध्ये रंगली आहे.

female Talathi red-handed accepting bribes
Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना 'ते' वादग्रस्त विधान भोवणार; भाजपकडून तक्रार दाखल

सागर कोकणे याने दाखल केलेल्या तक्रारीत दहा फेब्रुवारीला रात्री तलाठ्याबरोबर झालेल्या प्रकार मांडला आहे. या तलाठ्याने मित्राला फुकट वाळू टाक. याशिवाय वीस हजार रुपयांची मागणी केली. यानंतर रात्रभर वाळू वाहतूक करत राहा. पैसे न दिल्यास ट्रॅक्टर धरून घेऊन जाईल आणि तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल. यानंतर तलाठ्याने(Talathi) मुंबईला डान्सबारमध्ये घेऊन चल आणि माझा जेवढा खर्च होईल तेवढा कर, न केल्यास तुझ्यावर वाळू तस्करीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी या तलाठ्याने दिल्याचे तक्रारीत कोकणे याने म्हटले आहे.

तसेच संबंधित तलाठ्यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारदार कोकणे याने केला आहे. आता संबंधित तलाठ्याविरोधात संगमनेर पोलीस काय कारवाई करणार आणि महसूल विभाग (Revenue Department) या प्रकाराची काय दखल घेणार, याकडे लक्ष लागले आहे. या तलाठ्याचा यापूर्वी देखील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तलाठी कार्यालयासाठी चोरून विजेचा वापर केल्याची तक्रार होती. यावर प्रांताधिकाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई देखील केली आहे. मात्र ठोस अशी कारवाई या तलाठ्यावर होत नाही. हा तलाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याचे सांगितले जाते. तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनीही या तलाठ्याला वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव

पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याशी संपर्क साधल्यावर, असा तक्रारी अर्ज आला आहे. परंतु अर्जात काय आहे, हे सांगू शकत नाही, अशी भूमिका घेतली. हा अर्ज तपासासाठी संबंधित बीट हवालदाराकडे दिला आहे. यावर बीट हवालदार यांच्याकडे विचारणा केल्यावर असा अर्ज अजून तरी माझ्याकडे आलाच नाही, अशी माहिती दिली. पोलीस ठाण्यात संवेदनशील वाळू तस्करीबाबत गंभीर स्वरूपाची तक्रार येते आणि यावर संगमनेर तालुका पोलिसांमध्ये समन्वय दिसत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोणा-कोणाचे तोंड दाबणार!

दरम्यान, संगमनेरच्या महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे किस्से यानिमित्ताने चर्चेत येऊ लागले आहेत. रात्रीची गस्त घालताना सिन्नरच्या 'छम-छम'मध्ये जाऊन पैसे उडवतात, कोणी बारमध्ये आपली रात्र नशेत घालवतात, तर काही कामाच यावेळातच भलत्याच ठिकाणी जाऊन वेगळेच चाळे करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या चर्चांना एवढा जोर वाढला आहे की, त्या नगर शहरातील जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. परंतु ढगच फाटलय, कोणा-कोणाचे तोंड दाबणार, असं म्हणत जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

female Talathi red-handed accepting bribes
Jitendra Awhad Vs Ajit Pawar : 'जागावाटपाची लोकसभेला ही अवस्था असेल तर विधानसभेला काय अवस्था असेल?'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com