Ajit Pawar, Sunil Shelke, Shrirang Barane
Ajit Pawar, Sunil Shelke, Shrirang BaraneSarkarnama

Sunil Shelke News: मावळमध्ये वादाची ठिणगी! बारणेंचा आरोप अजितदादांच्या आमदाराच्या जिव्हारी; म्हणाले, "तुमचं अपयश..."

Maval Lok Sabha Constituency News: मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी आज अजित पवार गटासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Published on

Sunil Shelke On Shrirang Barne: मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी आज अजित पवार गटासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांनी माझा शंभर टक्के प्रचार केला नसल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे. बारणे यांचं हे वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे त्यांनी आता बारणेंना महायुतीत तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करु नये, असा सल्ला दिला आहे.

श्रीरंग बारणेंच्या (Shrirang Barne) वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, "महायुतीकडून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला महायुतीचा धर्म पाळा असं सांगितलं होतं. परंतु, मी आज बारणे यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांचं हे वक्तव्य महायुतीत तेढ निर्माण करणारं आहे. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य करु नये, असं मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. शिवाय त्यांनी ही बाब निवडणुकीआधी सांगितली असती तर बरं झालं असतं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अपयश मारू नका

तर पार्थ पवारांच्या (Parth Pawar) पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते नाराज होते असंही बारणे म्हणाले होते. यावर बोलताना शेळके म्हणाले, स्वतः पार्थ पवारांनी मावळमध्ये (Maval) येऊन महायुतीचा धर्म पाळा असं सांगितलं होतं. शिवाय बारणेंसाठी आम्ही सर्वांनी झोकून काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उघडपणे असं कोणीही बोलल्याचं मी पाहिलं नाही. बारणेंचं वक्तव्य मी ऐकलं त्यांनी म्हंटलं की, 'आमदार पधाधिकाऱ्यांनी काम केलं पण कार्यकर्त्यांनी काम केलं नाही.' पण त्यांनी आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आपलं अपयश मारू नये.

Ajit Pawar, Sunil Shelke, Shrirang Barane
Maval Lok Sabha News: 2019 मधील पार्थ पवारांच्या पराभवामुळे..., बारणेंच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण

श्रीरंग बारणेंचा पराभव होणार नाही

तसेच श्रीरंग बारणे यांचा पराभव होणार नाही, त्यांचा विजयच होईल. परंतु, विजयानंतर त्यांनी स्वतःच्या बळावर विजयी झालो असं म्हणू नये. आम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी तन-मन-धनाने काम केलं आहे. आपली नाराजी सांगून आपली बाजू कमकुवत आहे हे सांगू नका. मावळ लोकसभेचं 2019 चं मतदान पार पडलं तेव्हा पार्थ दादांना 5 लाख मते मिळाली होती. त्यावेळी बारणेंना 7 लाख मतं मिळाली होती, मात्र तेव्हा शिवसेना एकत्र होती. पण आता शिंदेंचे मतदान किती आहे हे त्यांनी सांगावं? या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे मतदान जास्त आहे. त्यामुळे जर ते 5 लाखांच्या पुढे गेले, तर ते मतदान आमचं असेल असंही शेळके यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com