Pune Politics : पुण्यातील मेळाव्याला अजित पवारांची दांडी; कोण करणार मार्गदर्शन?

Mahayuti Melava Pune Ajit Pawar Absent : महायुतीचा मेळावा होण्यापूर्वीच पुण्यात वेगवगेळ्या चर्चांना उधाण...
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Latest News Pune :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनोमिलन करण्याचा निर्धार महायुतीत सहभागी झालेल्या पक्षांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट ) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आरपीआय (ए) शिव संग्राम आणि मित्र पक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिला संयुक्त मेळावा आज होणार आहे.

विशेष म्हणजे या मेळाव्याला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार होते. मात्र, आता ते उपस्थित राहणार नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

पुण्यातील डी पी रस्त्यावरील शुभारंभ मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये संयुक्त मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आले होते. त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मिळणार होते.

आता Ajit Pawar हे नांदेड दौऱ्यावर असून तेथील मेळाव्याला ते संबोधित करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, पुण्यातील मेळाव्याला रामराजे निंबाळकर, दीपक केसरकर आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Ajit Pawar News
Mahayuti Melava: मनोमिलनापूर्वीच महायुतीत ठिणगी; पहिल्याच मेळाव्याला 'रासप'ने फिरवली पाठ

या मेळाव्याला अजित पवार कशाप्रकारे संबोधित करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांच्या फैरी रंगत होत्या. पहिल्यांदाच अजित पवारांचे मार्गदर्शन शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळणार असल्याने नेमके अजित पवार काय म्हणणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामुळे अजित पवारांनी हा दौरा रद्द झाल्याने सर्वच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

रुसवे फुगवे

हा मेळावा होण्यापूर्वीच महायुतीमधील पक्षांमध्ये रुसवे फुगवे समोर आले आहेत. महायुतीत सर्व पक्ष सहभागी असतानाही भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), तसेच शिवसेनेच्या नेत्यांचे फोटोंना वेगळे स्थान आणि इतर पक्षांच्या नेत्यांना वेगळे स्थान देण्यात आले आहे, असा सवाल महायुतीतील घटक पक्षांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आमचा पक्ष लहान असला तरी काय झाले, जसे तुमचे नेते आहेत, तसेच आमच्याही मनात आमच्या पक्षाच्या नेत्यांचे स्थान मोठे आहे. आपण एकत्र आहोत, असे दाखविता. मग बॅनरवर फोटो लावताना दुजाभाव का करता?' अशी विचारणा काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या बैठकीत केली होती.

रासपचा बहिष्कार

महायुतीच्या मेळाव्यात सहभागी होण्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. वरिष्ठ पातळीवर जागांबाबत अद्याप कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही या मेळाव्याला जाणार नाही. फ्लेक्सवर जानकर साहेबांचा फोटो असला तरी आमच्या वरिष्ठांकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत, अशी माहिती अशी माहिती रासप शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली.

edited by sachin fulpagare

Ajit Pawar News
Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com