Mahayuti Politics : फोडाफोडीवर तोडगा निघाल्याच्या फक्त चर्चाच..., अजितदादांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पुन्हा 'दे धक्का'

Mahayuti political crisis : अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिकडे अजित पवार दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेत असताना इकडे बालेकिल्ल्यात भाजपने थेट अजित पवार यांना पहिला मोठा धक्का दिला.
Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Dec : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे महायुतीतील मित्र पक्षांमध्येच एकामेकाचे नेते फोडण्याचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वाद होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर मित्र पक्षांमध्ये सुसंवाद ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीतील तिन्ही मित्र पक्षांच्या असलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत युतीतील घटक पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये फोडाफोडीवर (पक्षांतर) बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र काही दिवसातच या निर्णयाला पुण्यात हरताळ फासल्याची चर्चा आहे. महायुतीतील पक्षांमध्ये फोडाफोड करायची नाही, यावर निर्णय होत असतानाच भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का दिला आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Prakash Mahajan : 'माझा DNA संघाचा, ठाकरेंच्या विरोधाला घाबरत नाही...'; फडणवीसांच्या भेटीला जाण्याआधी महाजनांचं वक्तव्य, मनसे सोडण्याचं कारणही सांगितलं

काल अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिकडे अजित पवार दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेत असताना इकडे बालेकिल्ल्यात भाजपने थेट अजित पवार यांना पहिला मोठा धक्का दिला असून पिंपरी चिंचवडमधील बडा नेता आपल्या गळाला लावला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक १२ चे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकच माजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भालेकर यांच्या पक्षांतरामागील प्रमुख कारण म्हणून स्थानिक नगरसेवकाच्या दबदब्यामुळे राष्ट्रवादीतील पक्षकार्यावर परिणाम होत असल्याचं नमूद केलं जात आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Kolhapur Politics : 'आमच्याकडे 85 जण इच्छुक, वरिष्ठ नेते आम्हाला हलक्यात घेणार नाहीत...'; युतीच्या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना विश्वास

अलीकडच्या काही दिवसांपासून अजित पवार गट सोडून ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा जोरात होत्या. अखेर आज भालेकर यांनी अधिकृतपणे आपला निर्णय जाहीर करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात लवकरच प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. एकीकडे महायुतीमध्ये एकमेकांचे नेते फोडायची नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असताना. त्यात आता भाजपने थेट अजित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्येच मोठा धक्का दिल्याने हा वाद आणखीचं पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com