Nagpur News, 11 Dec : नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे राज्यातील अनेक नेते मंडळी नागपुरात ठाण मांडून आहेत. अशातच आज नुकतंच मनसेतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रामगिरी बंगल्यावर पोहोचले.
यावेळी त्यांच्यासोबत मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन यांनी माझा डीएनए पहिल्यापासून संघाचा असून मी ठाकरेंच्या विरोधाला घाबरत नसल्याचं म्हटलं.
शिवाय जे हिंदुत्वाचं काम करतात त्यांच्यासोबत आपण जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता महाजन म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडे माझं वैयक्तिक काम आहे. माझे त्यांच्यासोबत पारिवारिक संबंध आहेत.
वैभव खेडेकर कमळाकडे गेला. त्यामुळे मी खूश आहे. तर भाजपचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं. मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही.' तर यावेळी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचं कारण सांगताना ते म्हणाले, मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे.
माझा डीएनए राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असून मी ते कधी ते लपवलं नाही, असं ते म्हणाले. तर अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई)ने सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी पिट्या भाईला पुण्यातील एका बैठकीत खडसावलं होतं.
या प्रकरणावरून महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं. ते म्हणाले, 'शाखेवर जायला माझ्या वडिलांचा विरोध असताना आम्ही शाखेवर जायचो. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधाला कोण भितोय, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना घाबरत नसल्याचं वक्तव्य केलं.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.