Mahayuti News : महायुतीचं टेन्शन वाढलं; चिंचवडच्या भाजपच्या जागेवर राष्ट्रवादीने केला दावा

Maharashtra Assembly Elections 2024 : चिंचवडच्या जागेवरून महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. चिंचवडची जागा भाजपच्या वाट्याची असताना आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात एका-एका जागेसाठी रस्सीखेच वाढणार आहे.
Mahayuti Politics
Mahayuti Politics Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Elections 2024: तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. या आठवडाभरात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महायुती व महाविकास आघाडीतील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता चिंचवडच्या जागेवरून महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. चिंचवडची जागा भाजपच्या वाट्याची असताना आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात एका-एका जागेसाठी रस्सीखेच वाढणार आहे.

महायुतीमध्ये जागावाटप करीत असताना विद्यमान आमदाराची जागा त्या-त्या पक्षाकडे देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे, स्थानिक गणितं बिघडली आहेत. त्यातच आता चिंचवडमधील विधानसभेची भाजपची (BJP) जागा राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्याचे आश्वासन चिंचवडमधील नेत्यांना दिले आहे.

महायुतीमध्ये सध्या पिंपरी चिंचवडची विधानसभेची जागा भाजपकडे आहे. या मतदारसंघातून भाजप नेते लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप ह्या आमदार झाल्या आहेत.

त्यामुळे, या जागेवर भाजपचा दावा असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना किंवा भाजपकडून जो उमेदवार दिला जाईल, त्यांस उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे.

महायुतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला ती जागा. या महायुतीच्या धोरणानुसार चिंचवडची जागा भाजपला जाणार, हे उघड आहे. त्यामुळे येत्या काळात चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला न सुटल्यास बंडखोरी करत काही नेत्यांनी या ठिकाणी निवडणूक लढविण्याचा इशारा दिला आहे.

त्यानंतर चिंचवडच्या भाजपच्या या जागेवर दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी बारामतीमध्ये जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी अजितदादांनी चिंचवडमधील नेत्यांना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे समजते.

Mahayuti Politics
MVA News : कोकण पट्ट्यातील जागांसाठी आघाडीची रणनीती ठरली; ठाणे जिल्ह्यासाठी वेगळा प्लॅन

काही दिवसापुर्वीच भोसरीतील काही नाराज नगरसेवकांनी अजित पवार यांची साथ सोडत तुतारी हाती घेतली होती. तर काही जणांनी मविआची वाट धरली आहे. त्यामुळे येत्या काळात चिंचवडमधील अजित पवार गटाचे नेते नाराज असतील तर अजित पवारांच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणची बंडखोरी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतर समर्थकांचे समाधान येत्या काळात होणार का? त्यासाठी महायुतीचं जागावाटप पूर्ण होण्याची वाट पाहणार का? की तत्पूर्वीच काही निर्णय ही नेतेमंडळी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahayuti Politics
Election News : मोठी बातमी ! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; 'हे' आहे कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com