Mahesh Landage : भाजप सत्तेत येताच आमदार लांडगे अधिक अॅक्टीव्ह मोडवर

Mahesh Landage : यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत.
Mahesh Landge, Eknath Shinde
Mahesh Landge, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mahesh Landge : पिंपरी : राज्यात भाजप (BJP) पुन्हा सत्तेत येताच भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे अधिक सक्रिय झाले आहेत. बैलगाडा आणि मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे काल करीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. बैलगाडा शर्यतप्रेमी लांडगेंनीं ही शर्यत पुन्हा सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते.

मुख्यमंत्री मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुण्यातील विधानभवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी लांडगेंनी वरील प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याजोडीने त्यानी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) नवनगर विकास प्राधिकरणाच्या 'पीएमआरडीए'त झालेल्या विलीनीकरणातून निर्माण झालेले प्रश्नही मुख्यमंत्र्यांकडे मांडले.

त्यांनीच महाविकास आघाडी सरकार व त्यातही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधिकरण विलीनीकरणाच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाला पहिला प्रखर विरोध केला होता. पिंपरी महापालिका हद्दीतील प्राधिकरणाचे पालिकेतच विलीनीकरण करायला हवे होते, अशी त्यांची भूमिका आहे. विलीनीकरणानंतर मिळकती हस्तांतरण विविध प्रकारच्या परवानगी, जागामालकांच्या असलेल्या अडचणी अद्याप सोडविण्यात आलेल्या नाहीत.

Mahesh Landge, Eknath Shinde
Eknath Shinde गटाचे काय होणार? : हरिश साळवे यांच्यावर आता अखेरची भिस्त!

परिणामी पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामळे राज्य शासनाने सदनिकाधारक, जागामालकांचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न आधी मार्गी लावावा, प्राधिकरणाच्या अधिकारांचे सुसूत्रीकरण करावे, अशी मागणी लांडगेंनी यावेळी केली. यावर पिंपरी पालिका, 'पीएमआरडीए' अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

मराठा व बैलगाडा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

मराठा आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी लाखोंचे मोर्चे काढणाऱ्या मराठी तरुणांवर राज्यभरात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणीही लांडगेंनी या बैठकीत केली. त्याजोडीने बैलगाडा शर्यत लढ्यातील गुन्हेसुद्धा मागे घ्या, असे बैलगाडा शर्यतप्रेमी व ही शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करणारे लांडगे मुख्यमंत्र्याना म्हणाले.

Mahesh Landge, Eknath Shinde
न्यायालयाची सुनावणी व मंत्रिमंडळ विस्तार लांबला : आता अनेकांचा जोश उतरत चाललाय...

पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतील शेतकरी, गाडामालक, बैलगाडाप्रेमींवर गुन्हे नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त काहीच मागे घेतले गेले आहेत, असे सांगत राजकीय हेतूने दाखल केलेले बाकीचे गुन्हेही मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरही संबंधित गुन्ह्यांबाबत सविस्तर चर्चा करुन सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com